Home » Blog » पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांची भेट

पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांची भेट

by प्रतिनिधी
0 comments
Meeting between Modi and Sharad Pawar

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठप्प झालेले संसदेचे कामकाज, जंतरमंतरवर कॉक्रोज जनता पार्टीचे सुरू असलेले आंदोलन, दिल्लीत संसदेच्या बाहेर विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीमार या विषयावर सत्ताधारी भाजप एनडीए सरकार आणि इंडिया आघाडी आमने सामने असताना शरद पवारांनी बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे होत्या. भेटीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. पण देशभरातील विद्यार्थी आंदोलनाच्या प्रश्नांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Meeting between Modi and Sharad Pawar)

संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारी सुरू झाले. त्याच दिवशी क्रॉक्रोच जनता पार्टीने संसदेवर मोर्चा काढण्याचे आवाहन केले होते. या मोर्चात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नीट पेपरफुटीमुळे देशभरातील विद्यार्थी प्रक्षुब्द् झाले असल्याने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी अमानुष लाठीमार झाल्याने विरोधी पक्षांसह देशभरातील विविध संघटनाकडून निषेध व्यक्त केला जात आहे. दिल्लीतील जतंर मंतर आंदोलनाच्या ठिकाणी खासदार शरद पवारांनीही भेट दिली. तसेच सुप्रिया सुळे यांनी जतंरमंतरसह काँग्रेस पक्षाकडून पंतप्रधान निवासस्थानासमोर झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्या होता. (Meeting between Modi and Sharad Pawar)

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा दिला असताना आज शरद पवारांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. पवाराच्या स्वागताला स्वत: मोदी आले होते. पवारांनी मोदी यांच्याशी चर्चा कली. त्यावेळी पवारांच्या हातात एक निवेदन होते. तर सुप्रिया सुळे नोटबुक काही मुद्दे लिहून घेत होत्या. त्यामुळे पवारांची मोदीबरोबर कोणत्या विषयावर चर्चा झाली असावी याचा तपशील बाहेर आलेला नाही.

संसदेत आणि रस्त्यांवर भाजप एनडीए सरकारची मोठी कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. विरोधी पक्षही आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Meeting between Modi and Sharad Pawar)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!