Home » Blog » सगळं सगळं पोरकं झालंय…..

सगळं सगळं पोरकं झालंय…..

by प्रतिनिधी
0 comments
Sunetra Pawar's emotional post

बारामती : राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अपघातस्थळी असलेल्या स्मतीभवनाला अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार पार्थ पवार, जय पवार आणि अजित पवारांच्या बहिणी उपस्थित होत्या. सुनेत्रा पवारांनी अजित पवारांबद्दल सोशल मिडियावर भावनिक पोस्ट करुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. (Sunetra Pawar’s emotional post)

बारामती येथील गोजुबावी गावात २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघाताता अजित पवारांचे निधन झाले. त्यांच्या निधनाला २८ जुलै रोजी सहा महिने पूर्ण होतात. यापूर्वी दरवर्षी अजित पवार यांचा वाढदिवस साजरा व्हायचा. पण आज त्यांची जयंती दिनी अजित पवारांना अभिवादन करताना राष्ट्रवादीच्या सर्वच नेते दादांच्या आठवणीने हळवे झाले आहेत. त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आपल्या भावनांन सोशल मिडियावर पोस्ट लिहून वाट मोकळी करुन दिली. (Sunetra Pawar’s emotional post)

पोस्टमध्ये त्या म्हणतात, दादा…एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला…घर , कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा.. पण आज तुमचा हाच दिवस ‘जयंती’ म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय.हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा…

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात. तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ… आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही. काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.

आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत. दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी , तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील… माझ्या आयुष्याच्या साथीदाराला तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आदरपूर्वंक प्रणाम….!, अशी पोस्ट करत आदराजंली वाहिली आहे. (Sunetra Pawar’s emotional post)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!