Home » Blog » मंत्री मंगलप्रभात लोढांचे शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

मंत्री मंगलप्रभात लोढांचे शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

by प्रतिनिधी
0 comments
Lodha's controversial statement regarding farmers

जमीर काझी :  मुंबई : कधी मुस्लिमविरोधी तर कधी सार्वजनिक ठिकाणी कबुतरे पाळणे, जैन धर्मियाना विशेष सवलतीच्या मागणी करून नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या वादग्रस्त  कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे पुन्हा बरगळले आहेत. यावेळी त्यांनी चक्क बळीराजाच्याबद्दल आक्षेपार्ह  वक्तव्य केले आहे . “भारताला शेतीमुळे नव्हे, तर घरोघरी झालेल्या ‘स्टार्टअप्स’मुळे ‘सोने की चिडिया’ म्हणत होते आणि त्या काळात शेतीकडे पाप म्हणून पाहिले जात होते,” असे वादग्रस्त विधान केले. या विधानानंतर शेतकरी संघटना आणि राजकीय वर्तुळातून आणि सोशल मीडियावरून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या विधानाबाबत ‘यूटर्न’ घेतला. (Lodha’s controversial statement regarding farmers)

शेती करणे म्हणजे पाप समजले जात होते,

   शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी राज्यभरातून शेतकऱ्याकडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या काळात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी शेतकऱ्यानी विधानभवनाच्या परिसरातील झाडावर चढून आंदोलन केले होते. त्यामुळे सरकारच्या दुर्लक्षपणाबाबत सामान्यतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच मंत्री लोढा यांनी आज त्यामध्ये आणखी तेल घालण्याचे काम केले. एका कार्यक्रमातबोलताना त्यांनी ‘भारत हा शेतकऱ्यांच्यामुळे कधीच ‘सोने की चिडिया’ बनला नव्हता तर स्टार्टअपमुळे ओळखला जात होता. त्यावेळी शेती करणे म्हणजे पाप समजले जात होते, असे संतापजनक विधान केले. त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. (Lodha’s controversial statement regarding farmers)

अन्न खाऊ नका, नटबोल्ट,सिमेंट खाऊन दाखवा

 शेतकरी संघटनेते नेते रविकांत तुपकर म्हणाले,” तुम्ही शेतकऱ्यांनी पिकवलेले अन्न खाऊ नका, कारखान्यातील नट-बोल्ट आणि सिमेंट खाऊन दाखवा,” असे आव्हान त्यांनी दिले आहे. मंत्री लोढा यांनी देशातील तमाम शेतकऱ्यांची त्वरित माफी मागावी. किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले म्हणाले,’ हे विधान महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेती व्यवसायाचा अवमान करणारे असून मुख्यमंत्र्यांनी लोढा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी लोढा यांनी स्वतः रिअल इस्टेटचा व्यवसाय सोडून स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करावी, असा टोला लगावला आहे. (Lodha’s controversial statement regarding farmers)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00