Home » Blog » विधीमंडळात विमान अपघाताप्रकरणी चर्चा का घडवली जात नाही?

विधीमंडळात विमान अपघाताप्रकरणी चर्चा का घडवली जात नाही?

by प्रतिनिधी
0 comments
Demand for a discussion in the Legislature regarding the plane crash

जमीर काझी :  मुंबई :  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत संशयास्पदबाबी समोर आल्या असताना त्याबाबत अद्याप सरकार विधीमंडळात अद्याप चर्चा का घडवून आणली जात नाही. त्यामुळे व्हीआरएस कंपनीला सत्ताधाऱ्याकडूनच वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय बळावतोय आहे. असा आरोप करीत याप्रकरणी मोठा गौप्यस्फोट करु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी बुधवारी दिला . याप्रकरणी सरकारला गांभिर्य नसलेतर रस्त्यावर उतरून आंदोलन करु, असा घरचा आहेर अजित पवार यांच्या पक्षाचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी दिला.

विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी स्थगन प्रस्ताव नाकारला

 रोहित पवार यांनी या विषयावर अधिवेशनात चर्चा होण्यासाठी अनेक दिवसापासून प्रयत्नशील आहेत. याबाबत त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतली होती. आज विधानसभेत त्यांनी व्हीएसआर कंपनीबाबतची चर्चा स्थगन प्रस्तावाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला. पण अध्यक्षांनी तो नाकारला. त्यानंतर विधिमंडळ आवारात माध्यमाशी बोलताना ते म्हणाले “या गंभीर प्रकरणावर विधानसभेत चर्चा होऊ दिली जात नसेल तर कोणीतरी पॉवरफुल व्यक्ती यामागे आहे. व्हीएआर कंपनीला सत्ताधाऱ्यांकडून वाचवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा संशय वाढतोय.  शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनीही या मुद्द्यावर चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न करत करत आहेत.मात्र हा विषय जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. (Demand for a discussion in the Legislature regarding the plane crash incident)

 “या चौकशीबाबत सीबीआयकडं केस द्या, अशी मागणीचे स्मरण पत्र राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना देऊनही अद्याप काहीही होत नसल्याचे सांगून रोहित पवार म्हणाले “माझ्याकडं मोठी माहिती आहे. काही गोष्टी आम्ही समोर आणल्या आहेत. सरकारनं योग्य पाऊल उचललं नाही. तर उर्वरित माहितीही सार्वजनिक करू. तुम्ही स्वतःच्या माणसाला न्याय देऊ शकत नाही, तर इतरांना काय न्याय देणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Demand for a discussion in the Legislature regarding the plane crash)

आमदार मिटकरींचा रस्त्यांवर उतरण्याचा इशारा

विधानपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की , “ज्या अजित पवारांनी या विधिमंडळाला ४० वर्ष दिली. त्यांच्या अपघाताबाबत ज्या कंपनीवर आरोप होत आहेत त्यावर अद्याप चर्चा का होत नाही? शोक प्रस्तावाच्या दुसऱ्याच दिवशी ही चर्चा व्हायला पाहिजे होती. आज मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळं ही चर्चा सोमवारी घेणार असे सांगण्यात आलं. हे जे नेते आहेत त्यांना १००  वर्ष आयुष्य लाभो. पण त्यांच्या नेत्याच्या बाबतीत काही झालं तर ते असेच करतील का? ही चर्चा सोमवारी घाईघाईनं उरकली जाऊ नये. जर आम्हाला चर्चा करू दिली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशारा त्यांनी दिला आहे. (Demand for a discussion in the Legislature regarding the plane crash)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00