Home » Blog » घुसखोरांना शोधून शोधून देशाबाहेर घालवणार : अमित शाह

घुसखोरांना शोधून शोधून देशाबाहेर घालवणार : अमित शाह

by प्रतिनिधी
0 comments
Amit Shah's warning to infiltrators

कोल्हापूर : प्रतिनिधी : जो देशात जन्मला तोच देशात राहील. घुसखोरांना शोधून शोधून देशाबाहेर घालवणार, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास योजनेचा शुभारंभ झाला. त्यानंतर महायुती आयोजित कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. त्यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. (Amit Shah’s warning to infiltrators)

मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सांस्कृतिक कार्यमंत्री अशिष शेलार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्य मंत्री माधुरी मिसाळ, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवाजीराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. (Amit Shah’s warning to infiltrators)

अमित शाह म्हणाले,  देशभरात भाजप एनडीएची सत्ता असताना बंगाल मध्ये काय? असा प्रश्न विचारला जात होता. बंगालमधील जनतेने भाजपला आशीर्वाद दिला आहे. बंगालमध्ये मोठ्या संख्येने घुसखोर आहेत. या घुसखोरांना शोधून शोधून देशाबाहेर पाठवणार असा इशारा दिला. काँग्रेस आणि त्यांना पाठिंबा देणारे उद्धव ठाकरे घुसखोरीतील व्होट बँकेवर निवडून येत होते. भारत ही काही धर्मशाळा नाही. जो या देशात जन्मला तोच या देशात राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पूर्वी शिंदे गट म्हणून ओळखले जात होते. आता राज्यात एकनाथ शिंदे यांची एकमेवर शिवसेना आहे. दुसरी कोणतीही शिवसेना उरली नाही अशी टीकाही त्यांनी केली.   

मंत्री हसन मुश्रीफ यांनी आभार मानताना अमित शाह यांचे कौतुक करण्याची संधी साधली. स्वातंत्र्यानंतर पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे कणखर गृहमंत्री होते. त्यांनी संस्थाने खालसा करुन देश एकत्र केला. पटेलांच्या नंतर एक तगडा गृहमंत्री देशाला लाभला आहे तो कोल्हापुरचा जावई आहे. याचा आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे. (Amit Shah’s warning to infiltrators)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00