कोलकोता : पश्चिम बंगालमधील एका सरकारी इमारतीला आग लागून चार हजार ईव्हीएम मशिन जळून खाक झाली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मशिनचा वापर करण्यात आला होता. तृणमुल काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून भाजप प्रथमच पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आली आहे.
२४ तास आग विझवण्याचे काम
भाजप सरकारमधील मंत्री कौशिक चौधरी यांनी आग लागल्याची माहिती दिली आहे. पोलिस ठाण्यात आगीबाबत फिर्याद दिली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या इमारतीत दक्षिण २४ परगणा जिल्हा परिषदेचे कार्यालयही आहे. २४ तास आग विझवण्याचे काम अग्निशमन दलाकडून प्रयत्न करण्यात आले. (Four thousand EVMs got burnt in the fire)
घातपात आहे का? याचा तपास
मंत्री चौधरी म्हणाले. आगीत चार हजार ईव्हीएम जळून खाक झाल्या आहेत. यावर्षी झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत १० मतदारसंघांमध्ये हे ईव्हीएम वापरण्यात आले आहे. ही आग सामान्य वाटत नाही. यात काही घातपात आहे का याचा तपास केला जात आहे. आग नवव्या आणि दहाव्या मजल्यापर्यंत कशी पोहोचली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पहिल्यांदा दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे दिसून आले. (Four thousand EVMs got burnt in the fire)
आग सातव्या, आठव्या मजल्यावर कशी पोचली?
चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यांना आगीचा धोका पोहोचला नाही. पण साताव्या आणि आठव्या मजल्यांपर्यंत आग कशी पोहोचली याचा तपास करण्यात येत आहे. सरकार फॉरेन्सिक अहवालाची वाट पहात असल्याचे त्यांनी सांगितले. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की अन्य कारणामुळे लागली याचा अधिकारी तपास करत आहेत. इमारत सील करण्यात आली परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. (Four thousand EVMs got burnt in the fire)