Home » Blog » Raut Criticize : देश संतापात, पंतप्रधान मनोरंजनात

Raut Criticize : देश संतापात, पंतप्रधान मनोरंजनात

संजय राऊत यांची टीका

0 comments
Raut Criticize

मुंबई : प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमधील पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांच्या मृत्यूने देश संतापात आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये सभा घेतात. मुंबईत मनोरंजनातील विश्वातील तारे-तारकांसमवेत नऊ तास मजेत घालवतात. चेहऱ्यांवर कोणतीही चिंता, खेद काहीही नाही, अशी टीका  खासदार संजय राऊत यांनी केली. पंतप्रधान सर्वत्र फिरत आहेत, याचे श्रेय लष्काराला द्यायला हवे. आपले सैनिक देशासाठी मरायला तयार आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (Raut Criticize)

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली. पहेलगाम हल्ल्यानंतर देशातील सर्व जनेतसह विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर सरकारने ठोस भूमिका घेत कारवाई करण्याची गरज होती. मात्र सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती आणि प्रबळ नेतृत्वगुण नाही. त्यामुळे सर्व निर्णय लष्करावर सोपवून पंतप्रधान निवडणूक प्रचार आणि इतर कार्यक्रमात रममाण झाले आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. (Raut Criticize)

दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान मोदी जवानांच्या भरवश्यावर बिहारमध्ये निवडणूकीत प्रचाराला जातात. तसेच मुंबईत मनोरंजनाच्या विश्वात तारे तारकांसोबत नऊ तास मजेत घालवतात याकडेही राऊत यांनी लक्ष वेधले. आत्तापर्यंत जे झाले आणि जे काही होणार आहे त्याचे श्रेय भारतीय लष्काराचे आहे. देशाचे नेतृत्व हे पोकळ आहे. अशा कठीण प्रसंगात आमचा सरकारला पाठिंबा आहे. पण गेल्या दहा वर्षात सरकार पुन्हा पुन्हा चुका करत आहे याचे आम्ही कधीही समर्थन करणार नसल्याचे संजय राऊत म्हणाले. (Raut Criticize)

पंतप्रधान मोदी यांनी लष्कराला फ्री हॅन्ड दिला आहे या निर्णयावर संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांची खिल्ली उडवली आहे. राजकीय इच्छाशक्ती आणि नेतृत्वक्षमता संकटाच्या काळात महत्वाची असते. पण सैन्याला तुम्ही करा, आम्ही तुम्हाला पूर्ण निर्णय स्वातंत्र दिले आहे.  हे धोरण म्हणजे तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो. श्रेयही मीच घेणार. मात्र काही गडबड झाली तर खापर तुमच्यावर फोडणार. तुम्हाला पूर्ण अधिकार दिले होते. अशा भूमिका राजकीय नेतृत्व म्हणू शकणार नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली. (Raut Criticize)

नेतृत्व इंदिरा गांधीकडे होते.

नेतृत्वगुण काय असतात हे १९७१ च्या युदधात इंदिरा गांधी यांनी दाखवून दिले होते, असे संजय राऊत म्हणाले. आपल्याला पाकिस्तानशी युद्ध करायचे आहे. तुमची तयार आहे का असा थेट सवाल इंदिरा गांधी यांनी तत्कालिन लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांना केला होता. त्यावेळी तुमचे निर्णय तुम्ही घ्या अशी भूमिका घेतली नव्हती. आपल्याला युद्ध करायचे आहे, तयारीला लागला असा आदेश इंदिरा गांधी यांनी दिला होता याकडे खासदार राऊत यांनी लक्ष वेधले. घरात घुसुन मारण्याची भाषा करणारे आता कुठे आहेत?. तारेतारकांवर गुंतलेले कधी घुसणार?, कधी मारणार? असा सवालही त्यांनी केला आहे. (Raut Criticize)

शिवराज पाटलांनी राजीनामा दिला, अमित शहांचा राजीनामा घ्या

उरी पुलवामा घटना हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. या घटनांना अमित शहा जबाबदार आहेत.  त्यामुळे या घटनेवर काही बोलण्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अधिकार नाही. त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. यापूर्वी भाजपने शिवराज पाटील यांचा राजीनामा मागितला होता. त्यांनीही तो दिला होता याची आठवणही करुन दिली. गृहमंत्री राजीनामा देणार नसतील तर पंतप्रधानांनी त्यांच्यावर कारवाई करायला हवी होती. आम्ही सरकारला पाठिंबा दिला आहे पण त्यांच्या चुकांना पाठिंबा देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. (Raut Criticize)

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00