Home » Blog » चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजेभोसले पॅनेलचा दणदणीत विजय; चित्रकर्मी पॅनेलचा धुव्वा

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजेभोसले पॅनेलचा दणदणीत विजय; चित्रकर्मी पॅनेलचा धुव्वा

by प्रतिनिधी
0 comments
Rajebhosale panel wins the Film Corporation election

कोल्हापूर : प्रतिनिधी : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत निर्माते मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने १७ पैकी १६ जागा जिंकून दणदणीत विजयाची नोंद केली. विरोधी चित्रकर्मी पॅनेलला पराभवाचा धक्का बसला. महामंडळाच्या १७ जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. (Rajebhosale panel wins the Film Corporation election)

चित्रकर्मी पॅनेलमधील अभिनेते आनंद काळे, लेखक पितांबर काळे, निर्माते गणेश तळेकर, दिग्दर्शक सतीश रणदिवे, कला दिग्दर्शक सतीश बिडकर, निर्मात विजय शिंदे, रणजीत जाधव यांना पराभवाचा धक्का बसला. विरोधी चित्रकर्मी पॅनेला एकही जागा जिंकता आली नाही. दरम्यान अभिनेत्र् गटातून वर्षा उसगांवकर, संकलक गटातून विजय खोचीकर, गायक गटातून आनंद शिंदे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. (Rajebhosale panel wins the Film Corporation election)

समर्थ पॅनेलमधील विजयी उमेदवारांना पडलेली मते अशी,

* मेघराज राजेभोसले – निर्माता ९५१ मते,

* सुनील महाजन – निर्माता ७८६,

* दिपक कदम – दिग्दर्शक, ८४६,

* अजित शिरोळे – दिग्दर्शक ७५६,

* राज काझी – लेखक ८५०,

* सुशांत शेलार – अभिनेता ८९१,

* धनाजी यमकर – छायाचित्रण, ९५२,

* शरद चव्हाण – ध्वनीरेखक ९७५,

* रवी गावडे – निर्मिती व्यवस्था ९१०,

* सुभाष नकाते – नृत्य दिग्दर्शक ८९२,

* प्रवीण (वासू )पाटील – कला दिग्दर्शक ८८५,

* चैत्राली डोंगरे – रंगभूषा/वेशभूषा ९९८,

* गणेश गारगोटे – वितरण/प्रसिध्दी ९०७,

* विकास तोरणे – कामगार ८८६. (Rajebhosale panel wins the Film Corporation election)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00