Home » Blog » विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध

by प्रतिनिधी
0 comments
Five Mahayuti candidates elected unopposed in the Legislative Council elections

मुंबई : प्रतिनिधी : विधान परिषदेच्या १७ जागांवर होणाऱ्या निवडणुकीत पाच जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन तर भाजपचा एक उमेदवार विजयी झाला आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांने प्रयत्न केले. आता उरलेल्या १२ जागांसाठी १८ जून रोजी मतदान पार पडणार आहे. (Five Mahayuti candidates elected unopposed in the Legislative Council elections)

महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध असे

अरुण लखानी (भाजप – वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली), रवींद्र फाटक (शिवसेना शिंदे गट – ठाणे), दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना – यवतमाळ), विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – पुणे), अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग). (Five Mahayuti candidates elected unopposed in the Legislative Council elections)

१२ ठिकाणी होणार लढती

सोलापूर:  राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)

अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे (भाजप) विरुद्ध दत्तात्रय पानसरे (अपक्ष)

सांगली-सातारा :  धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस श. प) विरुद्ध किशोर धुमाळ (अपक्ष)

भंडारा-गोंदिया :  नरेश ईश्वरकर (काँग्रेस पाठिंबा) विरुद्ध अविनाश ब्राह्मणकर (भाजप)

नाशिक :  नरेंद्र दराडे (शिवसेना) विरुद्ध गोकुळ गीते (अपक्ष)

अमरावती :  हर्षदीप देशमुख (काँग्रेस) विरुद्ध प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध निलेश विश्वकर्मा (वंचित )

धाराशिव-लातूर-बीड :  बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)

परभणी-हिंगोली : सईद खान (शिवसेना) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध सुशील देशमुख (अपक्ष)

नागपूर (पोटनिवडणूक) :  डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस)

जळगाव :  नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध शरद तायडे (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध रेश्मा काळे (शिंदेंची शिवसेना बंडखोर)

नांदेड : अमर राजूरकर (भाजप) विरुद्ध रामदास पाटील (काँग्रेस)

छत्रपती संभाजीनगरमध्ये-जालना : सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (ठाकरेंची शिवसेना). (Five Mahayuti candidates elected unopposed in the Legislative Council elections)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00