Home » Blog » तब्बल दहा दिवसानंतर केरळच्या मुख्यमंत्रीपदी सतीशन यांच्या नावाची घोषणा

तब्बल दहा दिवसानंतर केरळच्या मुख्यमंत्रीपदी सतीशन यांच्या नावाची घोषणा

by प्रतिनिधी
0 comments
Kerala Chief Minister: Satheesan's Name Announced

तिरुवअंनतपूरम : पाच विधानसभांच्या निवडणुकीत काँग्रेसला सपशेल बहुमत मिळालेल्या केरळ राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी तब्बल दहा दिवसांनी घोषणा करण्यात आली. काँग्रेसचे व्ही.डी.सतीशन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडणार आहे. शपथविधीची घोषणा लवकरच काँग्रेस पक्षाकडून केली जाणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सतीशन यांच्याबरोबर के.सी.वेणुगोपाल, आणि रमेश चेन्नीथला यांच्या नावांची चर्चा सुरू होती. (Kerala Chief Minister: Satheesan’s Name Announced)

पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युडीएफने १४० पैकी १०२ जागा जिंकून बाजी मारली. गेले दहा वर्षे काँग्रेस पक्ष सत्तेपासून दूर होता. डाव्या लोकशाही आघाडीला केवळ ३५ जागांवर समाधान मानावे लागले. केरळसोबत निवडणूक झालेल्या पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पाँडेचरी राज्यात मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा संपन्न होऊन सरकार सत्तेवर आले. पण काँग्रेसकडून नेहमीप्रमाणे थंडे करके खावो या वृत्तीनुसार मुख्यमंत्री नावाच्या घोषणेस विलंब लावला. अखेर आज गुरुवारी सकाळी काँग्रेस हायकमांडने सतीशन यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर तिरुवनंतपूरमध्ये येथे झलेल्या काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. (Kerala Chief Minister: Satheesan’s Name Announced)

निवडणुकीपूर्वी सतीशन यांनी जर केरळमध्ये काँग्रेसची सत्ता आली नाही तर राजकीय संन्यास घेणार अशी घोषणा केली होती. सतीशन हे जमिनीवरचे नेते असून एर्नाकुलम जिल्ह्यातून ते निवडून आले आहेत. विद्यार्थी दशेतून काम केलेल्या सतीशन यांचे नेतृत्व पुढे आले. केरळमध्ये काँग्रेस पक्षाची बांधणी त्यांनी केली. एर्नाकुलम जिल्ह्यतील नेट्टूरचे रहिवासी असून एस.एच.कॉलेजमध्ये विद्यार्थी दशेतून राजकारणाची सुरूवात केली. हायकोर्टात वकिली करणाऱ्या सतीशन हे १९९० च्या निवडणूकीत हरले होते. पण त्यानंतर त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांनी सलग विजय मिळवत मतदारसंघासह केरळच्या राजकारणात पकड मिळवली. माजी मुख्यमंत्री के. करुणाकरण यांचे कट्टर समर्थक होते. २००६, २०११,२०१६ आणि २०२१ च्या निवडणकीत त्यांनी विजय मिळवला. (Kerala Chief Minister: Satheesan’s Name Announced)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00