Home » Blog » पंतप्रधानांच्या आवाहनामुळे आशिष शेलार यांचा कान्स दौरा रद्द

पंतप्रधानांच्या आवाहनामुळे आशिष शेलार यांचा कान्स दौरा रद्द

by प्रतिनिधी
0 comments
Task force of experts to study the growing digital addiction of children

मुंबई  :  देश कठीण परिस्थितीतून जात असल्याने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीबद्दल केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी यंदाच्या फ्रान्स येथील कान्स फिल्म फेस्टिव्हलला न जाण्याचा निर्णय सोमवारी घेतला. (Ashish Shelar Cancelled Cans Tour)

ते म्हणाले,  देशहिताला सर्वोच्च मान देत विभागीय खर्चांमध्ये संयम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अधिकाधिक बैठका व्हर्च्युअल माध्यमातून घेण्यात येणार असून संसाधनांचा मर्यादित वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. (Ashish Shelar Cancelled Cans Tour)

दरम्यान, कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होणाऱ्या मराठी चित्रपट तसेच त्यासंदर्भातील आवश्यक समन्वय आणि सहकार्यासाठी संबंधित यंत्रणा नियोजित पद्धतीने कार्यरत राहतील. तसेच मराठी सिनेमाला प्रोत्साहन देण्यासाठी जिथे आवश्यकता असेल तिथे आँनलाईन सहभागी होईन, असेही शेलार यांनी सांगितले.

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. जनतेला त्याग करण्याचा उपदेश देणारे नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी  कोट्यवधीची  उधळण करत आहेत. त्यामुळे त्यांनीच ‘राष्ट्रहितासाठी ‘त्याग’ करत वानप्रस्थाश्रमाकडे मार्गस्थ व्हावे’, ही १४० कोटी जनतेची भावना आहे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. (Ashish Shelar Cancelled Cans Tour)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाचा खरपूस समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, जेव्हा जगातील इतर देश संभाव्य संकटासाठी नियोजन आणि तयारी करत होते तेव्हा प्रचारमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष फक्त निवडणुका, जाहिराती, धर्मांधता आणि द्वेषाचे राजकारण करण्यात मग्न होते. नरेंद्र मोदी यांच्या निष्काळजीपणाची, अहंकारी, लहरी कारभाराची मोठी किंमत देशातील नागरिकांना मोजावी लागत आहे. देशात इंधन आणि LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, सोने-चांदी सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त जाहिरातबाजी, फोटोशूट व इव्हेंटबाजीत व्यस्त आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली आणि आता जनतेलाच उपदेश देत स्वतः मात्र ४०-५० गाड्यांचा ताफा घेऊन फिरत आहेत. देशाला दूरदृष्टी असलेला नेता नसला की, यापेक्षा वेगळे काही होणार नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00