Home » Blog » बंगालमध्ये हिंसाचार उफाळला; सुवेंद्रू अधिकारींच्या पीए ची हत्या

बंगालमध्ये हिंसाचार उफाळला; सुवेंद्रू अधिकारींच्या पीए ची हत्या

0 comments
Murder of Suvendu Adhikari's PA

कोलकोता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर हिंसाचार उफाळला आहे. भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये राडे सुरू झाले आहेत. टीएमसीची कार्यालये, कार्यकर्ते आणि नेत्यांना लक्ष्य केले जात असताना दुसरीकडे भाजपचे प्रमुख नेते सुवेंद्रू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या केल्याने कोलकोता हादरून गेले आहे. पश्चिम बंगालमध्ये राज्य राखीव पोलिस दलाचे अडीच लाख सुरक्षा रक्षक आणि बंगामधील पोलिस असतानाही हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आले आहे. (Murder of Suvendu Adhikari’s PA)

पश्चिम बंगालमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी टीएमसीच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले आहे. टीएमसीच्या गुंडांकडूनही हिंसाचार सुरू आहे असा आरोप भाजपकडून केला जात आहे. बुधवारी रात्री कोलकाताहून मध्यमग्राम येथील आपल्या घरी परत असताना चंद्रनाथ रथ (वय ४२) घरी परतत असताना २४ परगणा जिल्ह्यात गोळ्या घालून ठार मारण्यात आले. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार रथ यांची स्कॉर्पिओ कार सव्वादहा वाजता दोहरियाजवळ दोलतला आणि मध्यमग्राम चौमाथा दरम्यान त्याची कार अडवण्यात आली. त्यानंतर मोटार सायकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी रथ यांच्यावर जवळून गोळीबार केला. त्यानंतर संशयित पळून गेले. कारचा चालक बुद्धदेव बेरा हेही जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. (Murder of Suvendu Adhikari’s PA)

घटनास्थळी पोलिसांना रिकामी काडतुसे, जिवंत काडतुसे, गोळ्यांचे शेल जप्त केले आहेत. हल्लेखोरांनी वापरलेले पिस्तूल अत्याधुनिक असून असे शस्त्रे सहसा सामान्य गुन्हेगार वापरत नाहीत, असा कयास पोलिसांनी बांधला आहे. बेवारस गाडीला लावलेली नंबरप्लेटही बनावट होती. वाहनांचे चेसिस आणि इंजिन क्रमांकही पुसले आहे. पोलिसांना एकदंरित हा हल्ला नियोजनबद्ध केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

कोण होते चंद्रनाथ रथ? ….चंद्रनाथ रथ हे सुरेंद्रू अधिकारी यांचे जवळचे सहकारी होते. ममता बॅनर्जी लढवत असलेल्या भवानीपूर मतदार संघातील भाजपच्या रणनितीचे ते प्रमुख होते. सुवेंद्रू अधिकारी आणि ममता बॅनर्जी यांच्यातील हाय होल्टेज लढतीत भाजपची संघटनात्मक रणनिती, एकत्रित, ग्राउंड मॅनेजमेंटच्या समन्वयात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली होती. ३० एप्रिल रोजी भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर झालेल्या नाट्यमय धरणे आंदोलनात चंद्रनाथ रथ यांनी ममता बॅनर्जी यांना जाब विचारला होता. त्यातून भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढला होता.

रथ यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी सहारा रामकृष्ण मिशनमध्ये शिक्षण घेतले. तेथील अधात्मिक विचारांनी ते खूप प्रभावित झाले होते. महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर ते हवाई दलात दाखल झाले. वीस वर्षे त्यांनी सेवा केली. त्यानंतर त्यांनी कार्पोरेट क्षेत्रात काम केले आणि नंतर राजकीय समन्वय आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांकडे वळले. त्यांच्या आई हसी रथ या तृणमुल काँग्रेसमध्ये होत्या. त्यांनी स्थानिक पंचायत संस्थेत पदही भूषवले होते. सुरेंद्र अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रथ कुटुंबिय भाजपमध्ये गेले. कालांतराने रथ हे पडद्यामागील रणनीतीकार म्हणून उदयास आले. (Murder of Suvendu Adhikari’s PA)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00