Home » Blog » लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

by प्रतिनिधी
0 comments
Two students who consumed narcotics die

मुंबई : प्रतिनिधी : मुंबईतील गोरेगाव येथील प्रसिद्ध नेस्को सेंटरमध्ये झालेल्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांचे अतिसेवन केल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दोघे एमबीएचे विद्यार्थी असून मृतामध्ये एका तरुणीचा समावेश आहे. शनिवारी ११ एप्रिलला ही घटना घडली. वनराई पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. (Two students who consumed narcotics die)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी ११ एप्रिल रोजी गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये आयोजन केले होते. या कार्यक्रमाला दोन ते तीन हजार तरुण तरुणी होते. सहभागी झालेल्या युवतींना चार पिवळ्या गोळ्या दिल्या होत्या. यावेळी अनेकजणांनी मद्यपान केले होते. तसेच अंमली पदार्थांचे सेवन केले होते. अंमली पदार्थांचे सेवन जास्त झालेल्यांना त्रास झाला. त्यातील दोन तरुणींना जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटरमध्ये तर एका तरुणाला गोरेगावच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरू असताना तरुणाचा मृत्यू झाला. सोमवारी १३ रोजी एका तरुणींचा मृत्यू झाला. एक तरुण अत्यवस्थ असून तिच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. (Two students who consumed narcotics die)

पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केली आहे. मयत तरुण आणि तरुणी दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठित महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत होते. पोलिसांनी मयत विद्यार्थ्यांची ओळख सांगण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी आयोजनाशी संबधित दोन एमबीएचे विद्यार्थी आणि अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एमबीए महाविदयालयातील पंधरा जण सहभागी झाले होते. त्यांच्याच वर्गातील दोन विद्यार्थांनी एक्सटसी च्या गोळ्या पुरवल्याचे आढळून आले आहे. (Two students who consumed narcotics die)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00