Home » Blog » भाजपाने घेतला लैंगिक प्रकरणातील आरोपी आपटे राजीनामा 

भाजपाने घेतला लैंगिक प्रकरणातील आरोपी आपटे राजीनामा 

by प्रतिनिधी
0 comments
Apte resigns from the nominated corporator position

जमीर काझी :  मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच सर्वात मोठा पक्ष असलेल्या सत्ताधारी भाजपाला पुन्हा एकदा नामुष्की पत्करावी लागली आहे.बदलापूर बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटे याला देण्यात आलेले स्वीकृत नगरसेवकपद अवघ्या २४ तासाच्या आत मागे घेण्यात आले. त्याच्या नियुक्ती बद्दल नागरिकांतून आणि विरोधकाकडून व्यक्त होत असलेला तीव्र संताप आणि चौफेर टीकेमुळे आपटेला राजीनामा देण्यास सांगण्यात आले. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार त्याने राजीनामा पत्र शनिवारी सादर केले.

 देशभरात चर्चेला आलेल्या ठाणे बदलापूरातील आदर्श शिक्षण संस्थेतील बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणात सहआरोपी असलेल्या आपटे सध्या जामीनावर बाहेर आहे. त्याने बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपासाठी मोठी कामगिरी बजावली आहे. त्यामुळे शुक्रवारी नगरपरिषदेतच्या पहिल्या सभेत भाजपा व ,शिवसेनेच्या प्रत्येकी दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याची निवड करण्यात आली. भाजपाने त्यामध्ये आपटेला संधी दिली. जिल्हाधिकाऱ्याकडून ही निवड जाहीर करण्यात आली. त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच सोशल मीडियावरून टीकेची झोड उठली. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत  आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  हर्षवर्धन सकपाळ यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया लक्षात घेऊन आपटेला राजीनामा देण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार आपटेने  पत्र सादर केले. आपल्यामुळे भाजपाची व शिक्षण संस्थेची बदनामी होऊ नये, यासाठी आपण राजीनामा दिला असल्याचे त्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले. (Apte resigns from the nominated corporator position)

कोण आहे आपटे? दीड वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाल्याची बातमी समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. बदलापूरमध्ये नागरिकांनी निदर्शनं करुन रेल्वे वाहतूक रोखून धरली. संपूर्ण बदलापूर शहर बंद ठेवण्यात आले. लैंगिक शोषण प्रकरण उघडकीला येऊ नये, म्हणून शाळा प्रशासनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये तुषार आपटेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो दीड महिना फरार होता. त्यानंतर त्याने पोलिसांना शरणागती पत्करली होती. प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला शाळेतील सुरक्षारक्षक अक्षय शिंदे चा मुंब्रा परिसरात पोलिसांनी एन्काऊंटर त्याबाबत उच्च न्यायालयाने पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र राज्य सरकारने यानिर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन त्याला स्थगिती घेतली. (Apte resigns from the nominated corporator position)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00