Home » Blog » शक्तीपीठ महामार्ग सोलापूर,सातारा, सांगली कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गला जाणार

शक्तीपीठ महामार्ग सोलापूर,सातारा, सांगली कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गला जाणार

by प्रतिनिधी
0 comments
New Blueprint for the Shaktipeeth Expressway Released

कोल्हापूर : प्रतिनिधी : शेतकरी आणि जनतेचा दबाव झुगारुन भाजप महायुती सरकारने महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा प्रसिद्ध केला आहे. सातारा जिल्ह्यातून हातकणंगले तालुक्यातील जुने पारगावात शक्तीपीठ महामार्गाचा कोल्हापुरात प्रवेश होणार आहे. शासनाने नव्याने प्रसिद्ध केलेल्या सुधारित आराखड्याचा सरकारने मंजुरी दिला असून या मार्गात येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांचा मोठा विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (New Blueprint for the Shaktipeeth Expressway Released)

राज्य सरकारने वर्धा ते गोवा असा ८६५ किलोमीटरच्या शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला मंजुरी दिली आहे. या महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यांवर उतरुन शक्तीपीठला यापूर्वीच विरोध केला आहे. नव्या आराखड्यात १३ जिल्ह्यातील ४० तालुक्यांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ७३, सांगलीतील २५ आणि सातारा जिल्ह्यातील १६ तर सोलापूर जिल्ह्यातील ३५ गावांचा समावेश आहे. (New Blueprint for the Shaktipeeth Expressway Released)

शक्तीपीठ महामार्ग सातारा जिल्ह्यातून वारणा नदी पार करुन कोल्हापूर जिल्ह्यातील जुने पारगाव येथे प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर करवीर, राधानगरी, भुदरगड, आजरा आणि चंदगड तालुक्यातून हा मार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातून होणारा हा मार्ग पलूस, कडेगाव, वाळवा तालुक्यातून कोल्हापूर जिल्ह्यात येणार आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातून म्हसवड भागातून हा मार्ग मायणीच्या पुढील बाजूस सांगलीतील खानापूर तालुक्यात प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश शक्तीपीठ महामार्ग बार्शी, माढा, माळशिरस या तालुक्यातून सातारा जिल्ह्यात येणार आहे. (New Blueprint for the Shaktipeeth Expressway Released)  

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00