मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे राज ठाकरेंपासून दूऱच राहणार, पण आम्ही उद्धव ठाकरेसोबतही लढणार नाही अशी भूमिका मुंबईचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी मांडली. पण नंतर आपल्याच वक्तव्यावर यू टर्न घेत मुंबई महानगरपालिकेबाबत हायकमांड निर्णय घेतील असे म्हणून सारवासारव केली. (Bhai Jagtap)
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना मनसे यांची युती जवळजवळ पक्की झाली असुन अजून दोन्ही पक्षांनी घोषणा केली नसली तरी कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना हे तीन पक्ष आहेत. पण शिवसेना मनसेचे मनोमिलन सुरू झाल्याने काँग्रेस पक्षाची अडचण होऊ लागली आहे. महाविकास आघाडीत मनसे घेण्याबाबत काँग्रेस हायकमांडही अजून अनकुल नाहीत. त्यातच काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे. (Bhai Jagtap)
आज दीपावली बलिप्रतिपदेदिवशी मिडियाशी बोलताना आमदार भाई जगताप यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हणाले, मुंबई महापालिकेची निवडणूक स्थानिक कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे पक्षाचा झेंडा अनेक वर्षांपासून खांद्यावर मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांची कधीतरी निवडणूक लढवण्याची इच्छा असते. म्हणून मी स्वबळाची भूमिका मांडली आहे. राजकीय कामकाज समितीच्या बैठकीत प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासमोर देखील मी हेच सांगितले. तसेच राज ठाकरे तर दूरच, आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही. पण या वक्तव्यानंतर भाई जगताप म्हणाले, मुंबई महापालिका निवडणुकीबाबत हायकमांड भूमिका ठरवले. ती माझी वैयक्तिक तसेच माजी अध्यक्ष म्हणून भूमिका होती, असे म्हणत भाई जगताप यांनी आपल्याच वक्तव्यावर यू-टर्न घेतला. (Bhai Jagtap)