Home » Blog » निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात पटेल -तटकरेची पदे हटवली 

निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात पटेल -तटकरेची पदे हटवली 

by प्रतिनिधी
0 comments
Patel and Tatkare removed from their posts

जमीर काझी : मुंबई :  दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अजित पवार यांचा मृत्यू आणि विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून वाद वाढला असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील संदोपसंदी उघड झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तसेच यापूर्वी कार्याध्यक्षाना दिलेले अधिकाराबतचे पत्र रद्द करण्याबाबत कळविले आहे. यावरून पक्षात दोन गट पडले आहेत . पटेल व तटकरे यांनी परस्पर पाठविलेल्या पत्रामुळे नाराज सुनेत्रा पवारांनी हा आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे सांगण्यात आले. (Patel and Tatkare removed from their posts)

पत्रात फक्त दोन पदाधिकाऱ्यांचे उल्लेख

पक्षाकडून आयोगाला देण्यात आलेल्या पत्रात केवळ सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष, तर शिवाजीराव गर्जे खजीनदार असा दोनच पदांचा उल्लेख आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिल्या पत्रात १४ पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख आहे. मात्र त्यांच्या नावापुढे पदाचा उल्लेख नाही, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावापुढे कोणत्याही पदाचा उल्लेख या पत्रात नाहीये, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. (Patel and Tatkare removed from their posts)

तटकरे, पटेलांच्या नावापुढे पदाचा उल्लेख नाही

अजित पवार यांच्या काळात निवडणूक आयोगाला जे पत्र लिहिण्यात आले होते, त्यामध्ये मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे त्यांच्या पदाचा उल्लेख होता. मात्र त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला जे पत्र पाठवलं आहे, त्या पत्रात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे कोणत्याही पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये. (Patel and Tatkare removed from their posts)

सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष, शिवाजीराव गर्जे खजीनदार

जेव्हा एखाद्या व्यक्तीची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होते, तेव्हा निवडणूक आयोगाकडे पक्षाशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर करावी लागतात. तुमच्या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये कोण -कोण आहे? त्यांच्या नावाची यादी देखील निवडणूक आयोगाला पाठवावी लागते. त्यानुसार राष्ट्रीवादीकडून सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये केवळ सुनेत्रा पवार यांच्या नावापुढे राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा उल्लेख करण्यात आला आहे, तर दुसरीकडे शिवाजीराव गर्जे यांच्या नावापुढे खजीनदार असा उल्लेख करण्यात आला आहे. इतर कोणाच्याही नावापुढे पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये, दरम्यान जेव्हा सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली, तेव्हाच सुनील तटकरे याची प्रदेशाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती, मात्र या पत्रात त्याचा उल्लेख नसल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे

दरम्यान,हे पत्र समोर आल्यानंतर लगेचच राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी ट्विट करून त्यांनी प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदावर कायम असल्याचं म्हटले आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00