Home » Blog » होमुर्झ सामुद्रधुनीबाबत ट्रम्प यांनी भूमिका बदलली?

होमुर्झ सामुद्रधुनीबाबत ट्रम्प यांनी भूमिका बदलली?

by प्रतिनिधी
0 comments
Trump changes stance on the Strait of Hormuz

वॉशिंग्टन : अमेरिकेने इराणवर मोठा विजय मिळवला आहे. त्यांची रडार, क्षेपनास्त्र यंत्रणा, नाविक दल नष्ट केले आहे असे भाष्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. होमुर्झबाबतही ट्रम्प यांनी भूमिका बदलताना होमुर्झमधून तेल आयात करण्याची गरज नाही. ज्यांना तेथून तेल हवे असे त्यांनी स्वत:चा जलमार्ग खुला करावा असे मत व्यक्त केल्याने जागातिक उर्जा संकट यापुढेही कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेने दहा दिवस युद्धबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर आज ते काय बोलणार याकडे जगाचे लक्ष लागले होते. आज त्यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी भाष्य केले. (Trump changes stance on the Strait of Hormuz)

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, होमुर्झच्या सामुद्रधुनीमुळे ज्या देशांना इंधन मिळत नाही त्यांनी आता स्वत:च कारवाई करावी. अमेरिका त्यांना नेहमीच मदत करणार नाही असे म्हणत त्यांनी ब्रिटन आणि इतर देशांवर निषेध साधला. अमेरिका होमुर्झच्या सामुद्रधुनीतून जवळजवळ तेल आयात करत नाही. आम्हाला त्याची गरज नाही. ज्या देशांना होमुर्झमधून तेल आयात करायचे आहे. त्यांनी या मार्गाची काळजी घ्यावी. त्यांनी सुरक्षा ठेवावी. आम्हाला त्याची गरज नाही. एकदा इराणसोबतचे युद्ध संपले की हा मार्ग आपोआप सर्वांसाठी खुला होईल. (Trump changes stance on the Strait of Hormuz)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00