Home » Blog » निवडणूक आयोगाकडून बिनविरोध निवडींच्या चौकशीचे आदेश

निवडणूक आयोगाकडून बिनविरोध निवडींच्या चौकशीचे आदेश

by प्रतिनिधी
0 comments
Orders issued for an inquiry into unopposed elections

मुंबई : प्रतिनिधी : राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीतील सर्व बिनविरोध निवडीचींच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. बिनविरोध निवडीवर विरोधकांनी सत्ताधारी महायुती आणि निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

राज्यात २९ महानगरपालिकेच्या निवडणूकीत अर्ज भरणे, छाननी आणि अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली. ठाणे, कडोंमपा, जळगाव महानगरपालिकेत अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले असून त्यांची संख्या साठच्या पुढे गेली आहे. भाजपचे ४५, शिवसेनेचे १९, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन तर इस्लाम पार्टींचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीने प्रशासनावर दबाव टाकून, पैशाचा वारेमाप वापर केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. (Orders issued for an inquiry into unopposed elections)

काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने बिनविरोध निवडीवरुन निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. बिनविरोध निवड करायची असेल तर निवडणुकाच कशाला घेता, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. जर उमेदवार विकले जात असतील तर मतदारांनी कारायचे काय? दोन्ही निवडणूक आयोग भ्रष्ट मंत्र्यांचे हरकामे झाले आहेत. निवडणूक आयोगाने आता अहवाल मागितला आहे, त्यांना खरा अहवाल पालिका आयुक्त देणार आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. (Orders issued for an inquiry into unopposed elections)

आरोपानंतर राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणत्याही बिनविरोध उमेदवाराच्या विजयाची घोषणा केली जाणार नाही. निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. निवडून आलेल्या उमेदवारांनी विरोधी उमेदवारांवर दबाव टाकला का? त्यांना आमिष दाखवण्यात आले होते का? विरोधी उमेदवारांना धाक दाखून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावण्यात आले का? असे गैरप्रकार झाले आहेत का, याचा शोध निवडणूक आयोग घेणार आहे.मुंबई विकास प्राधिकारण क्षेत्रातील (एमएमआरडीए) महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडीमुळे वातावरण तापले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक उमेदवारांची बिनविरोध निवडू झाली. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेत राजकीय वातावरण तापले आहे. (Orders issued for an inquiry into unopposed elections)

कल्याण-डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक बिनविरोध उमेदवार निवडून आल्यामुळे हा मुद्दा पुढे आला आहे. तर मुंबईतील हायप्रोफाईल कुलाबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि जनता दलाच्या उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा आरोप आहे. याचीही दखल आयोगाने घेतली असून वॉर्ड ए येथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश देण्यात आले आहे. (Orders issued for an inquiry into unopposed elections)

You may also like

error: Content is protected !!