Home » Blog » गडहिंग्लज येथे दमसा साहित्य संमेलनाचे आयोजन; शनिवारी, रविवारी भरगच्च कार्यक्रम

गडहिंग्लज येथे दमसा साहित्य संमेलनाचे आयोजन; शनिवारी, रविवारी भरगच्च कार्यक्रम

by प्रतिनिधी
0 comments
The Damsaa Literary Conference was organized in Gadhinglaj

कोल्हापूर : प्रतिनिधी :  दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि शिवराज विद्या संकुल, गडहिंग्लज  यांच्या संयुक्त विद्यमाने ३६व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे १२ डिसेंबर ते  १४ डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी १२ रोजी ग्रंथदिंडीने संमेलनास प्रारंभ होणार असून शनिवारी उद्घघाटन होणार आहे.

 या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक प्रा.अविनाश सप्रे भूषवणार आहेत.  संमेलनाचे उद्धघाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष   प्रा. श्रीपाल सबनीस करणार आहेत. तर स्वागताध्यक्ष  प्रा. किसनराव कुराडे आहेत. संमेलनात दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी आहे. (The Damsaa Literary Conference was organized in Gadhinglaj)

  शुक्रवारी १२ डिसेंबर  रोजी सकाळी १० वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन केलेले आहे. शनिवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता संमेलनाचे  उद्धघाटन होणार आहे. संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अच्युत माने यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी योगिता माळी यांच्या स्मरणार्थ अनुबंध प्रतिष्ठान यांच्यातर्फे राज्यस्तरीय काव्य पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. दुपारी दोन वाजता ख्यातनाम साहित्यिक आसाराम लोमटे यांची मुलाखत विजय चोरमारे, नामदेव माळी घेणार आहेत. कविसंमेलन दुपारी तीन वाजता होणार असून याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी आणि समीक्षक रफीक सूरज आहेत. कवि संमेलनात किरण भावसार, सचिन शिंदे, विलास गावडे, धनाजी घोरपडे, धर्मवीर पाटील, संकेत म्हात्रे, सुभाष कोरे, गोपाळ गावडे, शिवाजी शिंदे, चंद्रशेखर कांबळे,अशोक अलगुंडी, नीलेश शेळके, महेश कराडकर, अभिजीत पाटील, रावसाहेब मुरगी, मधुकर जांभळे,उर्मिला शहा,संजय कांबळे, अनिल कलगुटकी,संभाजी जगताप, प्रणिता शिपुरकर, संजय थोरात, निर्मला शेवाळे यांचा सहभाग आहे. डॉ.चंद्रकांत पोतदार  हे सुत्रसंचालन करणार आहेत. सायंकाळी साडेपाच  ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांचे ‘कवितेचे जेव्हा गाणे होते’ हा कार्यक्रम होणार आहे. (The Damsaa Literary Conference was organized in Gadhinglaj)

 रविवार १४ डिसेंबर रोजी  सकाळी १० वाजता ‘आजच्या काळात लेखकांच्या पुढील आव्हाने!’ या विषयावर परिसंवाद होणार आहे.या परिसंवादाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत असून यामध्ये प्राचार्य डॉ. दत्ता पाटील, संपत देसाई, राजा माळगी, बाळासाहेब पाटील यांचा सहभाग आहे. सकाळी साडेअकरा वाजता लेखक -विद्यार्थी संवाद होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वाती शिंदे-पवार भूषवणार असून यामध्ये मनोहर भोसले, दयासागर बन्ने यांचा सहभाग आहे. (The Damsaa Literary Conference was organized in Gadhinglaj)

निमंत्रितांचे कविसंमेलन दोन वाजता होणार असून संजीवनी तडेगावकर अध्यक्षस्थानी असतील.  यामध्ये सुरेश शिंदे, हनुमंत चांदगुडे, भरत दौंडकर,आबा पाटील, रमजान मुल्ला  यांचा सहभाग आहे. ज्येष्ठ कथाकार अप्पासाहेब खोत यांच्या अध्यक्षतेखाली  दुपारी चार वाजता कथाकथन होणार आहे. यामध्ये हिंमत पाटील,जयवंत आवटे, सुभाष खोत यांचा सहभाग आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00