Home » Blog » India qualifies for Asian Cup : इराणला हरवून भारत अशियाई कपसाठी पात्र

India qualifies for Asian Cup : इराणला हरवून भारत अशियाई कपसाठी पात्र

by प्रतिनिधी
0 comments
India qualifies for Asian Cup

अहमदाबाद : भारताने बलाढ्य इराण संघाचा २-१ असा पराभव करत १७ वयोगट अशियाई फुटबॉल कपसाठी पात्रता प्राप्त करुन नवीन इतिहास घडवला. भारताने ४० मिनिटे संघर्ष करत इराणला बरोबरी साधून दिली नाही. (India qualifies for Asian Cup)

भारतीय खेळाडूंनी घरच्या मैदानावर दर्जेदार खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या हाफमध्ये भारताने इराणशी १-१ बरोबरी साधली होती. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये सातव्या मिनिटाला भारताचा बचावपटू कोरोऊ कोन्थोजमने लाँग शॉट टाकला. इराणचा बचाव अमीरन अफ्रोजियानीने तो रोखण्याचा प्रयत्न करत असताना तो खाली पडला. त्यावेळी मिडफिल्डर गुनलेबा वांगरखेरमने बॉलवर ताबा मिळवत वेगवान फटका मारला आणि बॉल झपकन जाळ्यात शिरला. या गोलने भारतीय खेळाडूंनी जल्लोष कला. गुनलेबालाने टी शर्ट काढून जल्लोष केला. त्यानंतर बरोबरी साधण्यासाठी इराणकडे ४० मिनिटे होती. पण भारतीय खेळाडूंनी इराणचा कडवा प्रतिकार मोडून काढला. बचाव आणि मधल्या फळीने सुंदर समन्यवय ठेवला. गोलरक्षकाने अनेक फटके सेव्ह केले. (India qualifies for Asian Cup)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00