Home » Blog » Rishi Desai Fast Runner : शिवाजी विद्यापीठाचा ऋषी देसाई ठरला वेगवान धावपटू

Rishi Desai Fast Runner : शिवाजी विद्यापीठाचा ऋषी देसाई ठरला वेगवान धावपटू

by प्रतिनिधी
0 comments
Rishi Desai Fast Runner

कोल्हापूर :  जयपुर येथे सुरू असलेल्या पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२५  स्पर्धेत शिवाजी विदयापीठाच ऋषी प्रसाद देसाई वेगवान धावपटू ठरला. १०० मीटर धावणे या प्रकारात  पुरुष विभागात ऋषी देसाई याने १०.५३ सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदकावर नाव कोरले. (Rishi Desai Fast Runner)

आज सोमवारी  सोमवारी मैदानी स्पर्धेस सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी शिवाजी विद्यापीठाने ऋषी देसाईने सुवर्णपदक पटकावत दमदार सुरुवात केली. उद्या मंगळवारी  शिवाजी विद्यापीठाचा मिक्स रिलेचा  संघ सहभागी होत असून तीन व चार डिसेंबर रोजी ११० मीटर अडथळा रेस, ८०० मीटर धावणे,भालाफेक, ३००० मीटर स्टीपल चेस, ४×१०० मीटर रिले रेस होणार असून शिवाजी विद्यापीठ सहभागी होणार आहे(Rishi Desai Fast Runner)

संघाचे प्रशिक्षक प्राध्यापक रामा पाटील व डॉ इब्राहिम मुल्ला तसेच संघ व्यवस्थापिका शिला मोहिते यांनी विद्यार्थ्यांचे सराव सत्र घेऊन योग्य मार्गदर्शन केले आहे संघास पथक प्रमुख डॉ एन डी पाटील हे प्रोत्साहित करत असून आजच्या सुवर्णपदकांमुळे शिवाजी विद्यापीठाचे २०० खेळाडू सहभागी झाले आहेत. सद्या पदक तालिकेवर शिवाजी विद्यापीठ १० व्या क्रमांकावर आलेला आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी प्रभारी प्र कुलगुरू डॉ. ज्योती जाधव कुलसचिव डॉ. विलास शिंदे व क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. (Rishi Desai Fast Runner)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00