Home » Blog » Monsoon withdrawal: मान्सून परतणार या तारखेपासून…

Monsoon withdrawal: मान्सून परतणार या तारखेपासून…

by प्रतिनिधी
0 comments
Monsoon withdrawal

नवी दिल्ली : यावर्षी मान्सूनपूर्व पावसाची सुरूवात मे महिन्याच्या मध्यावर असतानाच झाली. त्यानंतर पावसाने उघडीप दिलीच नाही. मान्सून सुरू झाल्यानंतर तर बहुतांश भागात त्याने चांगलीच हजेरी लावली. अगदी दुष्काळी पट्ट्यातही मुसळधार पाऊस झाला. (Monsoon withdrawal)

देशाच्या अनेक भागात विशेषत: उत्तर भारतात पावसाने मोठा कहर केला. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. ढगफुटीने जीवित आणि आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात झाली.

या वर्षी, मान्सूनने ८ जुलै या नेहमीच्या तारखेच्या नऊ दिवस आधी संपूर्ण देश व्यापला. २०२० नंतर २६ जूनपर्यंत संपूर्ण देश व्यापलेला  हा सर्वांत लवकर आलेला मान्सून होता. (Monsoon withdrawal)

२४ मे रोजी तो केरळमध्ये पोहोचला होता. २००९ मध्ये तो २३ मे रोजी पोहोचला होता.

देशात आतापर्यंत मान्सून हंगामात ७७८.६ मिमीच्या सरासरीच्या तुलनेत ८३६.२ मिमी पाऊस पडला आहे, जो ७% जास्त आहे. (Monsoon withdrawal)

आता मान्सून परतण्याच्या मार्गावर आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) नैऋत्य मान्सून १५ सप्टेंबरच्या सुमारास वायव्य भारतातून माघार घेण्यास सुरुवात करेल, असे शुक्रवारी (१२ सप्टेंबर) सांगितले.

मान्सून साधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये सुरू होतो. ८ जुलैपर्यंत तो संपूर्ण देश व्यापतो. १७ सप्टेंबरच्या सुमारास वायव्य भारतातून ही पाऊस प्रणाली माघार घेण्यास सुरुवात करते आणि १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे माघार घेते.

‘‘पश्चिम राजस्थानच्या काही भागातून १५ सप्टेंबरच्या सुमारास नैऋत्य मान्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे,’’ असे आयएमडीने एका निवेदनात म्हटले आहे.

मे महिन्यात, आयएमडीने असा अंदाज वर्तवला होता की जून-सप्टेंबर या मान्सून हंगामात भारतात ८७ सेमी या दीर्घकालीन सरासरीच्या १०६% पाऊस पडण्याची शक्यता आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00