Home » Blog » Jain community protests : कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवताना जैन समाजाकडून राडा

Jain community protests : कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवताना जैन समाजाकडून राडा

by प्रतिनिधी
0 comments
Jain community protests

मुंबई : प्रतिनिधी : दादरमधील कबुतरखान्यावरुन जैन समाज आक्रमक झाला. कबुतरखान्यावरील ताडपत्री काढण्याची मागणी करताना जैन आंदोलक आणि पोलिसांची झटापट झाली. पोलिसांचा विरोध डावलून जैन समाजातील आंदोलकांनी कबुतरखान्यावर झाकलेली ताडपत्री फाडून टाकली. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.  मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील कबुतरखाने बंद करण्याचा आदेश दिला आहे. (Jain community protests)

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेने कबुतरखान्यावर ताडपत्री बांधून कबुतरखाने बंदिस्त केले आहेत. त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.  तरीही जैन बांधवाकडून कबुतरखान्याच्या ताडपत्रीवर कबुतरांना खाद्य टाकले जाते. मंत्री मंगलप्रसाद लोढा यांनीही कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. जैन समाजाने आंदोलनाची हाक दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन समाजासोबत झालेल्या बैठकीत कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही असे म्हटले होते. तसेच, गरज पडल्यास आम्ही न्यायालयातही जाऊ, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेने कंट्रोल फिडिंग करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या होत्या. मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर बुधवारी होणार आंदोलन स्थगित केले होते. (Jain community protests)

बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दादरमधील कबुतरखान्याजळ जैन समाजातील बांधव आले. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.  यावेळी त्यांनी जय श्रीरामचा नारा देत आपला विरोध दर्शवला. शांततेत सुरू असलेल्या  आंदोलनाने  आक्रमक रुप धारण केले. यावेळी त्यांनी राडा घातला आणि पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. जैन समाजाच्या लोकांनी कबूतरखानावर लावण्यात आलेली ताडपत्री फाडून टाकली आणि कबुतरखान्यात खाद्य टाकले.

गेल्या अनेक महिन्यांपासून दादरमधील कबुतरखाना हटवण्याची मागणी होत आहे. याठिकाणी येणाऱ्या कबुतरांच्या प्रचंड संख्येमुळे या परिसरात वेगाने आजार पसरत असल्याचे समोर आले होते. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे अनेक नागरिकांना श्वसनाच्या व्याधी जडल्या होत्या. याशिवाय, हा कबुतरखाना रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हा कबुतरखाना हटवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात होती.

कबुतरांच्या थव्याला खायला घालणे हा सार्वजनिक उपद्रव आहे. हा मुद्दा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे आणि सर्व वयोगटातील लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर आणि संभाव्य धोका असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले. तसेच कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देशही न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले. शहरातील कबुतरखान्यांमध्ये कबुतरांचे जमाव रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आणि कठोर उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देशही न्यायालयाने बीएमसीला दिले. (Jain community protests)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00