Home » Blog » Decision for revenue dept:  महसूल कर्मचाऱ्यांसाठी बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय

Decision for revenue dept:  महसूल कर्मचाऱ्यांसाठी बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय

by प्रतिनिधी
0 comments
Decision for revenue dept

मुंबई : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या खात्यातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयासंदर्भातील अध्यादेश लवकरच जारी करण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या जबर भुर्दंड बसणार आहे. (Decision for revenue dept)

बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तलाठ्यांपासून ते उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत रोज ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागणार आहे. ऑफिसमध्ये फेस ॲपवर नोंदणी झाली तरच या कर्मचाऱ्यांना पगार मिळणार आहे. अन्यथा त्याला मुकावे लागणार आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

महसूल कर्मचाऱ्यांचे ऑगस्टचे वेतन हे फेस ॲपवरील नोंदीच्या आधारेच देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे महसूल कर्मचाऱ्यांना रोज कार्यालयात जावेच लागेल. तेथे फेस रिडींग नोंद केल्यानंतरच त्यांची त्यादिवशीच्या उपस्थितीचीही नोंद होणार आहे. (Decision for revenue dept)

महसूल मंत्र्यांकडून रायगड जिल्ह्यातील महसूलच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी हे आदेश दिले आहेत. (Decision for revenue dept) दरम्यान, मुंबईत २००६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या निकालावर बोलताना, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर उच्च न्यायालयात जी मांडणी झाली त्यावर स्टे मिळाला आहे. आता, सर्वोच्च न्यायालयात सरकार पुरावे मांडेल, आमच्या पुराव्याचा न्यायालय विचार करेल असे वाटते, असे ते म्हणाले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00