Home » Blog » Kharge on Dhanakar: धनखडांच्या राजीमाम्यावर खर्गे म्हणतात, ‘दाल में कुछ काला है!’

Kharge on Dhanakar: धनखडांच्या राजीमाम्यावर खर्गे म्हणतात, ‘दाल में कुछ काला है!’

by प्रतिनिधी
0 comments
Kharge on Dhanakar

नवी दिल्ली : जगदीप धनखड यांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या राजीनाम्यामागे काहीतरी गूढ आहे (दाल में कुछ काला है) असा संशय व्यक्त करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यासंदर्भात सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी बुधवारी (२३ जुलै) केली. (Kharge on Dhanakar)

धनखड हे भाजप-आरएसएसच्या लोकांपेक्षा भाजप आणि आरएसएसचा ‘बचाव’ जास्त करत असत, परंतु तरीही त्यांना राजीनामा द्यावा लागला, अशी टीकाही खरगे यांनी केली.

‘‘त्यांनी राजीनामा का दिला, त्याची कारणे काय आहेत, त्यामागील रहस्य काय आहे याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. आम्हाला वाटते की ‘दाल में कुछ काला है’ (काहीतरी गोंधळ आहे). ते निरोगी दिसता आणि त्यांच्याकडे नेहमीच चांगला शब्दसाठा आहे. पण काय झाले?’’ असा सवाल करून ते भाजप-आरएसएस लोकांपेक्षा भाजप आणि आरएसएसचा जास्त बचाव करत, असेही खरगे यांनी म्हटले आहे. (Kharge on Dhanakar)

संसदेचे अधिवेशन सुरू आहे. अशा वेळी त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे यामागचे खरे कारण काय आहे ते देशाला समजले पाहिजे, असे खरगे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

‘भारतीयता’ आत्मसात करून जगाला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांची उत्तरे देण्याचे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे, याकडे लक्ष वेधले असता खरगे यांनी, ते इतिहासाचे पुनर्लेखन करत आहेत, असे उत्तर दिले.

‘‘जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया लिहिले पण ते ते नाकारतात. ते आपल्या इतिहासाच्या प्राध्यापकांची मतेही नाकारतात. त्यांचा इतिहास वेगळा आहे आणि देशाचा इतिहास वेगळा आहे,’’ असे श्री. खरगे म्हणाले.

सोमवारी रात्री अचानक धनखड यांनी वैद्यकीय कारण सांगत आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजीनामा पाठवला आणि तत्काळ प्रभावाने राजीनामा देत असल्याचे सांगितले. (Kharge on Dhanakar) त्यानंतर काँग्रेसने मंगळवारी, धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा देण्यामागील कारणे त्यांनी सांगितलेल्या आरोग्याच्या समस्यांपेक्षा ‘‘खूप वेगळी’’ आहेत, असा दावा केला आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00