Home » Blog » ED chrgesheet against Rohit Pawar : ईडीकडून रोहित पवार यांच्याविरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल

ED chrgesheet against Rohit Pawar : ईडीकडून रोहित पवार यांच्याविरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल

by प्रतिनिधी
0 comments
ED chrgesheet against Rohil Pawar

मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२अंतर्गत पुरवणी आरोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. बारामती अॅग्रो कंपनीने कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदीमध्ये मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रोहित पवारांच्या बारातमी अॅग्रो कंपनीची आतापर्यंत ५० कोटी रुपयांहून अधिक किंमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जानेवारी २०२३ मध्ये ईडीने बारामती अॅग्रोच्या विविध ठिकाणांवर छापे टाकले होते. आता या प्रकरणात ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. (ED chrgesheet against Rohit Pawar)

आमदार रोहित पवारांनी आरोपपत्रावर म्हटले आहे की, कोणाचे काही ऐकले नाही म्हणून माझ्यावर ईडीची कारवाई होत आहे. आता न्यायलयात लढाई आहे तिथे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. सत्यमेव जयते. अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. (ED chrgesheet against Rohit Pawar)

रोहित पवार यांनी एक्स पोस्टवर असले म्हटले आहे ‘कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात ईडीने कारवाई केली हे जगजाहीर आहे, याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं. म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे. कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध दूध आणि पाणी का पाणी’ होईलच…! विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे. महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलंय, हा इतिहास आहे! सत्यमेव जयते. जय संविधान.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00