Home » Blog » Jayant Patil’s resignation :  राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदाचा जयंत पाटील यांचा राजीनामा

Jayant Patil’s resignation :  राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदाचा जयंत पाटील यांचा राजीनामा

by प्रतिनिधी
0 comments
Jayant Patil’s resignation

मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली होती. सातारा जिल्ह्यातील आमदार शशिकांत शिंदे यांची नवीन प्रदेशाध्यक्षपद म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. (Jayant Patil’s resignation)

राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असताना २०१८ मध्ये शरद पवार यांनी सुनील तटकरे यांच्या जागी जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. त्यांच्या नेतृत्वाखाली २०१९ च्या निवडणूकीत राष्ट्रवादीने निवडणूक लढवली होती. अजित पवार यांनी महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर जयंत पाटील मात्र शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले. २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीतही जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी होते. २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला कमी जागा मिळाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु होती. प्रदेशाध्यक्षपदी युवा चेहऱ्याला संधी देण्याची चर्चा सुरू होती. पण जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदी कायम राहिले. (Jayant Patil’s resignation)

गेल्या माहिन्यात १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनी त्यांनी मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर आज एक महिन्याने जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. या संदर्भात शिंदे म्हणाले. प्रदेशाध्यपदी माझी अद्याप निवड झालेली नाही. १५ तारखेला पक्षाची बैठक होणार आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे, राजेश टोपे, रोहित पवार यांची नावे चर्चेत आहेत. पण शशिकांत शिंदे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. (Jayant Patil’s resignation)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00