मुंबई : प्रतिनिधी : अजित पवार विमान अपघाताचा तपास योग्य, पारदर्शक पद्धतीने व्हावा यासाठी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार आवाज उठवणार आहेत. त्याच बरोबर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, शिवसेना शिंदे पक्ष, काँग्रेस पक्षासह तृणमुल पक्षाने आवाज उठवावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. तसेच व्हीएसआर, अरो, डीजीसीए आणि राज्य सरकारमधील दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. डीजीसीएशने व्हीएसआरवर कारवाई करण्यास उशीर केला असा आरोपही त्यांनी केला.
अजित पवारांच्या अपघातानंतर तब्बल २७ दिवसांनी नागरी विमान वाहतूक महासंचलनालयाने (डीजीसीए) व्हीएसआर व्हेचर्स या विमान कंपनीवर कारवाई केली आहे. व्हीएसआरच्या पाच लेअरजेट विमानंमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे सांगत वाहतकू बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यावर आमदार रोहित पवार यांनी विधानभवनाच्या प्रांगणात माध्यमांशी संवाद साधला. (Rohit Pawar will file a case)
रोहित पवार म्हणाले, अजित पवार यांचा अपघात झाला त्याच दिवशी डीजीसीएने दिलेल्या अहवालात व्हीएसआरला क्लिनचीट देण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनीही व्हीएसआर कंपनीला क्लिनचीट दिली. काल मंगळवारी डीजीसीएजच्या अहवालात व्हीएसआरच्या विमानांमध्ये तांत्रिक त्रुटी मान्य केल्या आहेत. हे आम्हाला छोटेशे यश आले आहे. पण यापुढे आमची लढाई सुरू राहील असे त्यांनी सांगितले. व्हीएसआर, अरो, डीजीसीए आणि विमानाशी संबधित राज्य सरकारमधील दोषी अधिकाऱ्यावर मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Rohit Pawar will file a case)
व्हीएसआरचे मालक आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री यांच्यात आर्थिक संबध आहेत. त्यामुळे व्हीएसआरवर कारवाई होत नाही. नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. (Rohit Pawar will file a case)