Home » Blog » Mushrif criticizes Azami: अबू आझमींना वारी समजलेली नाही : मुश्रीफ

Mushrif criticizes Azami: अबू आझमींना वारी समजलेली नाही : मुश्रीफ

by प्रतिनिधी
0 comments
Mushrif criticizes Azami

कोल्हापूर : प्रतिनिधी : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना वारी आणि वारकरी संप्रदाय हा विषयच समजलेला नाही. त्यांना भेटून मी समजून सांगणार आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी (२३ जून) स्पष्ट केले. (Mushrif criticizes Azami)

अबू आझमी यांनी रविवारी सोलापुरात बोलताना, पंढरीच्या वारीमुळे निघणाऱ्या पालख्यांनी रस्ता जाम होतो मात्र त्याबाबत एकही मुस्लिम तक्रार करत नाही. उलट हिंदू बांधवांच्या खांद्याला खांदा लावून तो चालत असतो, असे वक्तव्य केले होते. तसेच काही मशिदीसमोरथोडावेळ रस्त्यावर नमाज पडली जात असताना त्याला विरोध केला जातो, याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे.त्याचा संदर्भ देत अबू आझमी म्हणाले, परवा पुण्याहून येत होतो, त्यावेळी मला पालखी येण्याची वेळ झाली आहे, त्यामुळे लवकर निघण्यास सांगण्यात आले. त्यामुळे लवकर निघालो, अशा प्रसंगावेळी रस्ता जाम होतो, वाहतुकीची कोंडी होते म्हणून एकही मुस्लिम तक्रार करत नाही. देशात सर्वांना एकच कायदा लागू असताना मुस्लिमांसाठी मात्र वेगळे नियम लावले जातात. काही मशीदीत गर्दीमुळे जागा अपुरी पडत असल्याने थोड्यावेळासाठी रस्त्यावर नमाज पडली जाते, त्याला जाणीवपूर्वक विरोध केला जातो, उत्तर प्रदेश सरकारने त्याबद्दल पासपोर्ट रद्द करण्याची धमकी दिली होती, असे सांगून ते म्हणाले, हिंदू सणावेळी एक तरी कोणा मुस्लिमाने रस्ता अडविला म्हणून कधी तक्रार केली आहे का?, उलट हिंदू बांधवाच्या सोबत उभे असतात.,’ (Mushrif criticizes Azami)

आझमी यांच्या या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे हा वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी अबू आझमी यांच्या विधानावरुन टीका केली आहे. ते म्हणाले, आझमी यांना वारकरी संप्रदाय समजलेला नाही. मी त्यांना समजावून सांगतो. वारी वर्षातून एकदा असते, नमाज दिवसातून पाच वेळा असतो. लोकांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी नमाज पडली पाहिजे. वारीमध्ये लाखो लोक वर्षातून एकदा चालत जातात. त्यासाठी सरकारने पालखी मार्ग तयार केले आहेत. अबू आझमी यांचा आरोप राजकीय आहे. त्यांना वारी आणि वारकऱ्यांबद्दल मी समजावून सांगेन.

हेही वाचा :
समाजवादीच्या तीन आमदारांची हकालपट्टी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00