Home » Blog » Trump threats Apple: ट्रम्प यांची ॲपल कंपनीला धमकी

Trump threats Apple: ट्रम्प यांची ॲपल कंपनीला धमकी

भारतात उत्पादन कराल तर २५ टक्के कर लादण्याचा इशारा

by प्रतिनिधी
0 comments
Trump threats Apple

वॉशिंग्टन : भारतात आयफोन उत्पादन करणाऱ्या ॲपल कंपनीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (२३ मे) पुन्हा एकदा धमकी दिली. आयफोन अमेरिकेत विकले जाणारे आयफोन आमच्याच देशात तयार झाले पाहिजेत. ॲपलने याचे पालन करावे, अन्यथा कंपनीवर किमान २५ टक्के कर लादला जाईल, असा इशाराही ट्रम्पनी दिला आहे. (Trump threats Apple)

ॲपल कंपनी चीनमधील उत्पादन कमी करून भारतातील उत्पादन हळूहळू वाढवू इच्छिते. एकूण आयफोनपैकी भारतात १५ टक्के आयफोन उत्पादन होते. येत्या वर्षात हे उत्पादन आणखी वाढविण्याची योजना आहे. विशेष म्हणजे अॅपल अमेरिकेत आयफोनची निर्मिती करत नाही. कंपनीचे बहुतांश आयफोन चीनमध्ये तयार केले जातात. भारतात दरवर्षी ४० दशलक्ष युनिट्स तयार केले जातात. (Trump threats Apple)

याआधीही ट्रम्प यांनी ॲपलला तशी सूचना केली होती. आमच्या देशात विकले जाणारे आयफोन आमच्याच देशात उत्पादित झाले पाहिजे. ट्रम्प यांनी याबद्दल अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांना आधीच सांगितले होते, याचा संदर्भही दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर पोस्ट केली आहे. “अ‍ॅपलच्या टीम कूक यांना याआधी सांगितले की, अमेरिकेत विकले जाणाऱ्या त्यांच्या आयफोनचे उत्पादन आणि निर्मिती अमेरिकेत होईल. भारतात किंवा इतर कुठेही नाही. तसे झाले नाही तर अ‍ॅपलला अमेरिकेला २५ टक्के कर द्यावा लागेल. हे लक्षात घेतल्याबद्दल तुमचे आभार!” असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ट्रम्प यांनी आठवडाभरापूर्वीच हे विधान केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ॲपल कंपनीला इशारा दिला आहे. (Trump threats Apple) पीटीआयच्या वृत्तानुसार, १५ मे रोजी कतारमधील दोहा येथे ट्रम्प यांनी वक्तव्य केले होते. त्यानंतर लगेचच, भारतीय अधिकाऱ्यांनी अॅपलच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली होती. अ‍ॅपलच्या भारतातील गुंतवणुकेसंबंधीच्या योजना कायम आहेत. तसेच भारतात एक प्रमुख उत्पादन केंद्र बनवण्याचा कंपनीचा विचार आहे, अशा शब्दांत आश्वस्त केले होते.

हेही वाचा :
माजी राज्यपाल मलिक यांच्याविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00