Home » Blog » काँग्रेसचे संघटन सृजन अभियाना अंतर्गत बैठकीचे आयोजन

काँग्रेसचे संघटन सृजन अभियाना अंतर्गत बैठकीचे आयोजन

by प्रतिनिधी
0 comments
(Congress's 'Sanghatan Srujan' Campaign)

कोल्हापूर :  जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच कोल्हापूर शहर आणि  इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी मध्ये नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. संघटन सृजन अभियाना अंतर्गत १३ एप्रिल  ते १८ एप्रिल या कालावधीत बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.  या अभियानात काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह काँग्रेस पक्षासोबत जोडले जाण्याची इच्छा असणाऱ्या सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे. (Congress’s ‘Sanghatan Srujan’ Campaign)

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्यावतीने संघटन सृजन अभियान राबवण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी मध्ये नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठका होणार आहेत. (Congress’s ‘Sanghatan Srujan’ Campaign)

बैठकीसाठी  चंद्रपूरच्या खासदार  प्रतिभाताई धानोरकर, मुख्य निरीक्षक जय शंकर पाठक , सहनिरीक्षक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस  सचिन सावंत , प्रदेश सचिव नंदकुमार कुंभार, राहुल गायकवाड, सुनील मलके आणि राहुल वरदा उपस्थित राहणार आहेत. (Congress’s ‘Sanghatan Srujan’ Campaign)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00