Home » Blog » Rabada ban : रबाडावर तात्पुरती बंदी

Rabada ban : रबाडावर तात्पुरती बंदी

उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्याने कारवाई

0 comments
Rabada

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडावर उत्तेजक द्रव्यसेवन प्रकरणात दोषी आढळल्याने तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेमध्ये रबाडा गुजरात टायटन्सकडून खेळत असून या मोसमात ३ एप्रिलला तो मायदेशी परतला होता. (Rabada)

रबाडाने दक्षिण आफ्रिकेतील ‘एसए२०’ या टी-२० स्पर्धेत खेळताना त्याने उत्तेजक द्रव्याचे सेवन केले होते. हे उत्तेजक द्रव्य त्याने कामगिरीत सुधारणा करण्यासाठी घेतलेले नसून वैयक्तिक आनंदासाठी घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. रबाडा ‘एसए२०’ स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या मालकीच्या एमआय केपटाउन या संघाकडून खेळतो. दक्षिण आफ्रिका क्रिकेटर्स असोसिएशन या संघटनेने रबाडावर तात्पुरती बंदी असल्याचे पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. तथापि, रबाडाने कोणत्या उत्तेजक द्रव्याचे सेवन केले, याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (Rabada ban)

रबाडानेच एक पत्रक प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या वर्तनाचा आणि क्रिकेटप्रेमींची निराशा केल्याचा मला खेद आहे. क्रिकेटला गृहीत धरण्याची चूक मी यापुढे कधीही करणार नाही. क्रिकेट खेळायला मिळणे हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. माझ्यावर सध्या तात्पुरती बंदी असून हा बंदीचा कालावधी संपवून पुनरागमन करण्यास मी उत्सुक आहे. या सर्व गोष्टींचा सामना एकट्याने करणे मला शक्य नव्हते. क्रिकेट साउथ आफ्रिका आणि गुजरात टायटन्स यांच्या पाठिंब्यासाठी मी ऋणी आहे. गुजरातने मागील लिलावात २९ वर्षीय रबाडाला १०.७५ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. (Rabada ban)

हेही वाचा :
मला भारतीय संघात परत यायला आवडेल

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00