अहमदाबादः अठरा वर्षे एकही विजेतेपद न मिळालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने अखेर इतिहास घडवत सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलचे विजेतेपद पटकावले. विराट कोहलीच्या नाबाद ७५ धावांच्या बळावर बेंगळुरूने ही कामगिरी केली. (Royal Challengers Bengaluru IPL Champion)
रविवारी रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे झालेल्या आयपीएल २०२६ अंतिम सामन्यात बंगळुरूने गुजरात टायटन्सवर विजय मिळवत पुन्हा एकदा चॅम्पियनचा किताब आपल्या नावावर केला.
विराट कोहली तारणहार
प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सला बंगळुरूच्या गोलंदाजांनी २० षटकांत ८ बाद १५५ धावांवर रोखले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली पुन्हा एकदा मोठ्या सामन्यात संघाचा तारणहार ठरला. त्याने यावेळीही ८२ चेंडूत शानदार ७५ धावा झळकावत विजेतेपदाला गवसणी घातली.
कोहलीच्या संयमी पण प्रभावी खेळीमुळे बंगळुरूने दबावाखालीही डाव सांभाळला आणि अखेर विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदा ट्रॉफी जिंकलेल्या या संघाने रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्या हंगामात विजेतेपद मिळवत आयपीएलमध्ये नवे वर्चस्व निर्माण केले. (Royal Challengers Bengaluru IPL Champion)
दमदार सलामी
आयपीएल २०२६च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने दिलेल्या १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने धडाकेबाज सुरुवात केली. विराट कोहली आणि वेंकटेश अय्यर यांनी अवघ्या ४.३ षटकांत पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी उभारली.
वेंकटेश अय्यरने १६ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ३२ धावांची झंझावाती खेळी केली. मात्र त्यानंतर बंगळुरूला काही झटपट धक्के बसले. देवदत्त पडिकल अवघ्या १ धावेवर बाद झाला, तर कर्णधार रजत पाटीदार १५ धावा करून माघारी परतला. कृणाल पांड्या फक्त १ धाव करू शकला. एकवेळ एख बाद ६२ अशा मजबूत स्थितीत असलेल्या बंगळुरूची अवस्था ३ बाद ८९ अशी झाली होती.
मात्र दुसऱ्या टोकाला विराट कोहली खंबीरपणे उभा राहिला. चौथ्या विकेटसाठी त्याने टीम डेव्हिड सोबत ४१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. टिम डेव्हिडने १७ चेंडूंमध्ये २४ धावांची उपयुक्त खेळी करत संघावरील दडपण कमी केले.
विराट मात्र अखेरपर्यंत नाबाद राहिला. त्याने अवघ्या २५ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले, जे आयपीएलमधील त्याचे सर्वात जलद अर्धशतक ठरले. कोहलीने ४२ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि ९ चौकारांसह नाबाद ७५ धावांची दमदार खेळी करत बंगळुरूला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. (Royal Challengers Bengaluru IPL Champion)
रशीद खानच्या दोन बळींनी रंगत
दरम्यान, रशीद खान याने एका षटकात दोन बळी घेत बंगळुरूला धक्का दिला. परंतु विराट खेळपट्टीवर अखेरपर्यंत पाय रोवून उभा राहिल्याने गुजरातची डाळ शिजली नाही. (Royal Challengers Bengaluru IPL Champion)
त्याआधी गुजरात टायटन्सने २० षटकांत ८ बाद १५५ धावा केल्या. संपूर्ण स्पर्धेत प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलेला साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांची सलामी जोडी अंतिम सामन्यात अपयशी ठरली. गिल ८ चेंडूंमध्ये १० धावा करून जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने साई सुदर्शनला १२ धावांवर तंबूत पाठवले.
या दोघांच्या अपयशानंतर गुजरात संघाने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. मात्र वॉशिंग्टन सुंदरने संयमी खेळी करत एकहाती डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सुंदरने ३७ चेंडूंमध्ये नाबाद ५० धावा केल्या. त्याच्यामुळेच गुजरातला १५५ धावांपर्यंत मजल मारता आली.
गुजरातकडून निशांत सिंधूने २०, जोस बटलरलने १९, अर्शद खानने १५, तर राहुल तेवतिया आणि राशिद खानने प्रत्येकी ७ धावा केल्या. कगिसो रबाडा ३ धावांवर नाबाद राहिला. (Royal Challengers Bengaluru IPL Champion)
बंगळुरूकडून रसिख दार याने प्रभावी मारा करत ४ षटकांत २७ धावा देऊन ३ बळी घेतले. भुवनेश्वर कुमार आणि हेझलवूडने प्रत्येकी दोन बळी घेतले.
अंतिम सामन्यात खेळलेले दोन्ही संघः (Royal Challengers Bengaluru IPL Champion)
गुजरात टायटन्स
साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, निशांत सिंधू, जेसन होल्डर, राशिद खान, कगिसो रबाडा, अरशद खान, मोहम्मद सिराज.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टिरक्षक), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, जोश हेझलवूड, रसिख सलाम दार.