Home » Blog » CM Warns MLA: आ. गायकवाड यांना कडक समज द्या, अन्यथा कारवाई

CM Warns MLA: आ. गायकवाड यांना कडक समज द्या, अन्यथा कारवाई

मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदेंना सूचना

by प्रतिनिधी
0 comments
CM Warns MLA

मुंबई : विशेष प्रतिनिधी : शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्यातील वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शनिवारी (२६ एप्रिल) चांगलेच खडसावले. एकनाथ शिंदे यांनी त्यांना कडक समज द्यावी, पुन्हा असे झाले तर कारवाई करणार, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. (CM Warns MLA)

आ.गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलिस भ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम आहे, असे बेजाबाबदार व आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पोलिसांबाबतच्या अपमानास्पद विधानाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमानंतर गृहखाते सांभाळत असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे त्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, “पोलिसांबद्दल असे बोलणे योग्य नाही. मी स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे की, संजय गायकवाड यांना कडक समज द्यावी. हे असे चालणार नाही. वारंवार ते असे बोलत असतील तर त्यावर कारवाई केली जाईल,” अशी तंबी त्यांनी दिली. (CM Warns MLA)

ते म्हणाले, ‘‘ मी उपमुख्यमंत्री असतानाही शिंदे यांना गायकवाड यांच्याबद्दल सांगितले होते. तरीही त्यांची पोलिसांबद्दलची भाषा कायम असेल तर त्यावर कारवाई करावीच लागेल.’’

आ. गायकवाड नेमकं काय म्हणाले होते?

महाराष्ट्र पोलिसांवर पातळी सोडून टीका करताना आ. गायकवाड यांनी ‘‘महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खाते फक्त भारतातच नव्हे तर जगात कुठेही नाही. शासनाने पोलीस खात्याशी संबंधित कोणताही कायदा केला की, त्याचा एक हप्ता वाढतो. सरकारने गुटखाबंदी केली की पोलिसांचा हप्ता वाढतो. दारू बंद केली की ती चालू ठेवण्यासाठी पोलिसांचा हप्ता वाढतो. पोलिसांनी प्रामाणिकपणे केले की या सगळीच गुन्हेगारी दूर होऊ शकते. यांनी फक्त ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या उक्तीप्रमाणे प्रामाणिकपणे काम करावे.’’

हेही वाचा :
गोव्यात एक हजार कोटींचा जमीन घोटाळा
 दहशतवाद्यांविरोधातील कारवायांचे लाईव्ह कव्हरेज टाळा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00