Home » Blog » जिल्हा परिषद निवडणूक दोन दिवस पुढे ढकलली;  ५ ऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान

जिल्हा परिषद निवडणूक दोन दिवस पुढे ढकलली;  ५ ऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान

by प्रतिनिधी
0 comments
Zilla Parishad election has been postponed by two days

मुंबई :  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन दिवस पुढे ढकलल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्याने राज्य निवडणूक आयोगाने तारखांमध्ये बदल केला आहे.  निवडणूकीचे मतदान  ५ फेब्रुवारी ऐवजी ७ फेब्रुवारीला होणार आहे.  मतमोजणी नऊ फेब्रुवारीला होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. ५ फेब्रुवारी  ऐवजी आता ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.  मतमोजणी ७  फेब्रुवारी  ऐवजी ९ फेब्रुवारी रोजी होईल. (Zilla Parishad election has been postponed by two days)

राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १३  जानेवारी २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी ३१ जानेवारी  च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी  रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात २८ जानेवारी  ते ३० जानेवारी  पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना ३१ जानेवारी  रोजी प्रसिद्ध करतील. (Zilla Parishad election has been postponed by two days)

आता ७ फेब्रुवारी  रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती ५ फेब्रुवारी  रोजी रात्री १० वाजता होईल. ९ फेब्रुवारी  रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात ११ फेब्रुवारी पर्यंत प्रसिद्ध केली जातील. (Zilla Parishad election has been postponed by two days)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00