कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत १८ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा भाऊ ठरला आहे. भाजपला १२ जागेवर समाधान मानावे लागले. काँग्रेसने १५ जागा जिंकून आपली जिगर कायम ठेवली आहे. पन्हाळ्याच्या बुरुजाला तडे गेले असतानाही जनसुराज्यने मात्र पाच जागा तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीने चार जागा जिंकून आपली बार्गेनिंग पॉवर कायम ठेवली आहे. शिवसेना शिंदे पक्षाने नऊ जागा जिंकली आहेत. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, जनसुराज्य या महायुतीतील पक्षांची संख्या पाहता जिल्हा परिषदेवर महायुतीची झेंडा फडकण्यास कोणतीच अडचण उरणार नाही पण राष्ट्रवादी अध्यक्षपदासाठी आग्रही राहण्याची शक्यता आहे. (NCP is the largest party in Kolhapur Zilla Parishad)
जिल्हा परिषदेच्या ६८ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी शिवसेना विरुद्ध काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी थेट लढत झाली. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले होते. कोल्हापूर महानगरपालिकेत पिछाडीवर पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेत १८ जागा जिंकून जिल्हा प्रदेश अध्यक्षपदावर आपला दावा बळकट केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने होमपिच कागल, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यात घवघवीत यश मिळवले. काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे चिरंजीव राहूल पाटील यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातील बालेकिल्ल्यात शंभर टक्के यश मिळवले.
राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसने १५ जागा जिंकून जिल्ह्यातील आपली पकड ढिलू पडू दिलेली नाही. महानगरपालिकेप्रमाणे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि शेतकरी संघटनेचे राजू शेटृटी यांच्या मदतीने महाविकास आघाडीच्या १७ जागा जिंकल्या. काँग्रेसने राधानगरी तालुका, करवीर, गगनबावडा, हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी तालुक्यात १५ जागा जिंकून चांगलेच यश मिळवले. लोकसभेप्रमाणेच नेत्यांनी एकत्रित मोट बांधल्याने राधानगरीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले. आजरा तालुक्यातील स्थानिक आघाडीतून निवडून आलेले दोघेही मुश्रीफांचे समर्थक आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्याने गडहिंग्लज, चंदगड आजरा तालुक्यात राष्ट्रवादीने बाजी मारली. (NCP is the largest party in Kolhapur Zilla Parishad)
केंद्रात, राज्यात सत्ता असलेल्या भाजपला १२ जागांवर समाधान मानावे लागले. करवीर, हातकणंगले, कागल तालुक्यात त्यांना यश मिळाले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक तीन जागा जिंकल्या. हातकणंगलेत आमदार प्रकाश आवाडे तर कागलमध्ये मुश्रीफांबरोबर युती केल्याने समरजीत घाटगे आणि संजयबाबा घाटगे यांच्यामुळे भाजप या निवडणुकीत तरली गेली. (NCP is the largest party in Kolhapur Zilla Parishad)
शिवसेना शिंदे गटाने नऊ जागा जिंकल्या. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भुदरगडचा किल्ला राखला तर राधानगरीत त्यांना एकाच जागेवर समाधान मानावे लागले. करवीर विधानसभा मतदारसंघात आमदार चंद्रदीप नरके आणि हातकणंगलेत खासदार धैर्यशील माने यांच्यामुळे शिवसेनेचा स्कोअर समाधानकारक राहिला. पण त्यांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांचा कागल तालुक्यात सुपडा साफ झाला.
जनसुराज्य शक्ती पक्षाने पाच जागा जिंकल्या. आमदार विनय कोरे यांना त्यांच्या होमपीच पन्हाळा तालुक्यात सेटबॅक बसला पण शाहूवाडी तालुक्यात त्यांना चांगले यश मिळाले. हातकणंगले आणि गडहिंग्लजमध्ये जागा जिंकून त्यांनी आपली सदस्य संख्या पाचवर नेली. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीने चार जागा जिंकल्या. काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रत्येकी एक जागा जिंकून आपले अस्तित्व जिवंत ठेवले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाची कामगिरी अतिशय खराब झाली. माजी आमदार सत्यजीत पाटील यांनी भेडसगावची एक जागा जिंकून पक्षाचे अस्तित्व राखण्याचे प्रयत्न केले. तीन जागेवर अपक्ष निवडून आले असले तरी एक उमेदवार जनसुराज्यच्या पाठिंब्यावर तर आजरा तालुक्यातील दोन्ही जागा दोन्ही राष्ट्रवादी आणि स्थानिक आघाडीच्या जोरावर निवडून आल्या.
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल
कागल तालुका
म्हाकवे जि.प.मतदार संघ, काकासो सावडकर भाजप
सिद्धनेर्ली जि.प.मतदार संघ, सुयशा घाटगे, भाजप.
कसबा सांगाव जि.प.मतदार संघ, सुवर्णा कांबळे, राष्ट्रवादी
नानीबाई चिखली, जि.प.मतदारसंघ, शिवानी भोसले, भाजप
बोरवडे जि.प. मतदारसंघ, शोभाताई फराकटे, राष्ट्रवादी
सेनापती कापशी जि.प. मतदारसंघ, शिल्पा खोत, राष्ट्रवादी काँग्रेस
पन्हाळा तालुका
कोडोली जि.प.मतदार संघ, अमरसिंह पाटील, जनसुराज्यशक्ती पुरस्कृत अपक्ष
सातवे जि.प. मतदारसंघ, डॉ. जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
पोर्ले तर्फ ठाणे जि.प.मतदार संघ, भगवान पाटील, राष्ट्रवादी
यवलूज जि.प.मतदार संघ, पूजा पाटील, राष्ट्रवादी
कोतोली जि.प.मतदार संघ, वर्षाराणी अरुण पाटील, शिवसेना शिंदे
कळे जि.प. मतदारसंघ, शोभा बेलेकर, जनसुराज्य शक्ती
हातकणंगले तालुका
कुंभोज जि.प.मतदार संघ, शीतल यादव, जनसुराज्यशक्ती
भादोले जि.प.मतदारसंघ, सोनाली सावंत, काँग्रेस
घुणकी जि.प. मतदारसंघ, शुभांगी कुंभार, काँग्रेस
आळते जि.प.मतदारसंघ, वर्षा सावर्डेकर शिवसेना शिंदे गट
शिरोली पुलाची जि.प.मतदारसंघ, सलीम महात, भाजप
रुकडी जि.प.मतदारसंघ, अतिष शिंगे, शिवसेना शिंदे गट
रुई जि.प.मतदारसंघ, राहूल आवळे, काँग्रेस
कोरोची जि.प.मतदारसंघ, सानिका आवाडे, भाजप .
कबनूर जि.प.मतदारसंघ, कुमार कांबळे, भाजप
पट्टणकोडोली जि.प.मतदारसंघ, महेश पाटील, भाजप
रेंदाळ जि.प.मतदारसंघ , शिवाजी जाधव, शिवसेना शिंदे गट
भुदरगड तालुका
आकुर्डे जि.प.मतदारसंघ, अर्चना निकम, शिवसेना शिंदे पक्ष
कडगाव, जि.प.मतदारसंघ, सारिका यशवंत नांदेकर, शिवसेना शिंदे पक्ष
पिंपळगाव जि. प.मतदारसंघ, रोहिणी आबिटकर, शिवसेना शिंदे गट
गारगोटी जि.प.मतदारसंघ, रेश्मा देसाई, शिवशाहू आघाडी
करवीर तालुका
गडमुडशिंगी जि.प.मतदारसंघ, तानाजी पाटील, भाजप
उचगांव, जि.प.मतदारसंघ, नामदेव वाईंगडे, भाजप
वडणगे जि.प. मतदारसंघ इंद्रजीत पाटील, शिवसेना शिंदे गट
शिये जि.प. मतदारसंघ, विश्वनाथ पाटील, काँग्रेस
गोकुळ शिरगांव जि.प.मतदार संघ, सुदर्शन खोत, काँग्रेस
पाचगांव, संग्राम पाटील, काँग्रेस
कळंबे तर्फ ठाणे जि.प.मतदार संघ, वनिता भोगम, भाजप
पाडळी खुर्द जि.प.परिषद मतदार संघ, राजेंद्र सूर्यवंशी, राष्ट्रवादी
शिंगणापूर जि.प.परिषद मतदार संघ, रसिका अमर पाटील, काँग्रेस
सांगरुळ जि.प.परिषद मतदार संघ, रेखा मुगडे, राष्ट्रवादी काँग्रेस
सडोली खालसा जि.प.मतदार संघ, क्रांतीसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
निगवे खालसा जि.प.मतदार संघ, एकनाथ पाटील, काँग्रेस
गडहिंग्लज तालुका
नूल जि.प. मतदारसंघ, अनिरुद्ध रेडेकर, जनसुराज्य शक्ती पक्ष
हलकर्णी, जि.प. मतदारसंघ, शिवशंकर हत्तरगी, राष्ट्रवादी काँग्रेस
भडगाव, जि.प. मतदारसंघ, अमरसिंह चव्हाण
गिजवणे जि.प. मतदारसंघ शैलजा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
नेसरी जि.प. मतदारसंघ, संग्राम कुपेकर, राष्ट्रवादी काँग्रेस
शाहूवाडी
बांबवडे जि.प.मतदारसंघ, राजकुंवर गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस
सरुड जि.प.मतदारसंघ, अमर पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष
शित्तूर जि.प.मतदारसंघ, सर्जेराव पाटील पेरीडकर, जनसुराज्य
आंबार्डे जि.प.मतदारसंघ, स्नेहल वेल्हाळ, जनसुराज्य
गगनबावडा तालुका
तिसंगी जि. प. मतदारसंघ, सोनाली विलास पाटील, काँग्रेस
असळज जि. प.मतदार संघ, संभाजी पाटणकर, काँग्रेस
राधानगरी तालुका
कसबा तारळे जि. प.मतदार संघ, अमृता डोंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस
राशिवडे जि.प.मतदारसंघ, सागर धुंदरे, काँग्रेस.
कसबा वाळवे जि.प.मतदारसंघ, अरुण जाधव, शिवसेना शिंदे गट
सरवडे जि.प.मतदार संघ, संयोगिता मोरे, काँग्रेस
राधानगरी जि.प.मतदार संघ, अभिजीत तायशेटे, काँग्रेस
शिरोळ तालुका
दानोळी जिल्हा मतदारसंघ, नंदिनी संदीप कांबळे , ( स्वाभिमानी शेतकरी संघटना)
दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघ, उत्तरा विजित शिंदे, ( राजर्षी शाहू विकास आघाडी )
आलास जिल्हा परिषद मतदारसंघात, प्रशांत शहापूरे ( भाजप)
उदगाव जिल्हा परिषद, अमोल चव्हाण ( राजर्षी शाहू विकास आघाडी )
यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघ अर्चना अमोल चौगुले ( काँग्रेस )
नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघात, प्रचिता कोळी ( राजर्षी शाहू विकास आघाडी.)
अब्दुल्ललाट जिल्हा परिषद मतदारसंघात श्रद्धा गायकवाड ( राजर्षी शाहू विकास आघाडी)
आजरा तालुका
पेरणोली जि.प. मतदारसंघ, सुधीर देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस
उत्तूर जि.प. मतदारसंघ, शिरीष देसाई, राष्ट्रवादी
चंदगड तालुका
अडकुर जि.प. मतदारसंघ राजश्री लक्ष्मण गावडे, भाजप
माणगाव जि.प. मतदारसंघ, मानसी भोगण, राष्ट्रवादी
कदनुर जि.प. मतदारसंघ, विद्या विलास पाटील, राष्ट्रवादी
तुडये जि.प. मतदारसंघ रचना गावडे, राष्ट्रवादी