बेळगाव : प्रतिनिधी : गॅस सिलिंडर, इंधनासह जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केल्याच्या निषेधार्थ बेळगाव जिल्हा युवा काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात डोक्यावर सिलिंडर घेऊन आणि लहान मुलांची खेळायची कार घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. वीर राणी कित्तूर चन्नमा चौकात रास्ता रोको करण्यात आला. (Youthcongress protest)
भाववाढ करून देशातील भाजप सरकार सर्वासामान्य जनतेवर अन्याय करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच भाजप सरकारचा निषेधही करण्यात आला. दरवाढीच्या विरोधात मोर्चाने जावून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
तत्पूर्वीचन्नम्मा सर्कल येथे आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी पोलिसांनी मोर्चाला रोखले. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘भ्रष्ट भाजप सरकारचा धिक्कार असो,’ ‘मोदी हटाओ, देश बचाओ,’ अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. त्यानंतर पोलिसांनी बॅरिकेड्स हटवून राहुल जारकिहोळी यांच्यासह निवडक युवा काँग्रेस नेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यासाठी सोडले. (Youthcongress protest) बेळगाव जिल्हा शाखेतर्फे युवा काँग्रेस नेते राहुल जारकीहोळी, आमदार असिफ (राजू) सेठ बेळगाव जिल्हा ग्रामीण युवा काँग्रेस अध्यक्ष कार्तिक पाटील, शहर अध्यक्ष सागर दिवटगी व चिक्कोडी जिल्हा युवा काँग्रेस अध्यक्ष सिद्दिक अंकलगी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा :
शेअर बाजारात उसळी
ट्रम्पसमोर झुकणार नाही