Home » Blog » Bawankule : राहूल गांधीचे आरोप बावनकुळेंनी खोडून काढले

Bawankule : राहूल गांधीचे आरोप बावनकुळेंनी खोडून काढले

by प्रतिनिधी
0 comments
Bawankule

जमीर काझी :  मुंबई :   महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेसचे नेते व  लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोडून काढलेत आहेत. (Bawankule)

बावनकुळे यांनी  ‘एक्स ‘वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,  राहुल गांधी म्हणतात महाराष्ट्रात पाच महिन्यांत ३९ लाख मतदारांची वाढ “संशयास्पद” आहे. पण राहुलजी २००९ ला काय झालं होतं? तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो. एप्रिल २००९ ला लोकसभा निवडणुकीत 

७ कोटी २९ लाख ५४ हजार मतदार होते तर ऑक्टोबर २००९ ला विधानसभा निवडणुकीत ७ कोटी ५९ लाख ६८ हजार मतदार झाले. तेव्हाही फक्त पाच महिन्यांत ३०  लाख मतदार वाढले होते! (Bawankule)

तेव्हा तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस-आयोग युतीच होती? तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? याचं उत्तर द्या.

२००४, २००९ ला जिंकलात तेव्हा काही प्रश्न पडले नाहीत! आज पराभव झाला, महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला झिडकारलं तेव्हा रडगाणे सुरू झाले .

राहुलजी आकड्यांचं अर्धवट वाचन करून देशाला गोंधळात टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला नाकारलं आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे. त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचं कारण देत आहात. (Bawankule)

आमच्या महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने बहुमताने निवडून दिले. जनतेने आमच्यावर दाखविलेला हा विश्वास आहे. तो पुढील निवडणुकीतही असाच अभंग राहील. आपण वारंवार खोटे बोलून राज्यातील जनदेशाचा अपमान करीत आहात. जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही.असेही त्यांनी म्हटले आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00