Home » Blog » Eknath Shinde : ‘कॉमन मॅन’ला ‘सुपरमॅन’ करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde : ‘कॉमन मॅन’ला ‘सुपरमॅन’ करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shidne : महायुतीच्या पत्रकार परिषदेत विकास कामांचे रिपोर्ट कार्ड सादर

by प्रतिनिधी
0 comments
Eknath Shinde

मुंबई : महायुतीने गेल्या सव्वा दोन वर्षात कृषी वीज बिलाची माफी दिली. गुंतवणूकीत महाराष्ट्र अग्रेसर बनवला आहे. मेट्रो, अटलसेतू, समृध्दी महामार्ग योजना राबवत पायाभूत सुविधेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सर्व जातीसाठी महामंडळे स्थापन करुन त्यांना मदत केली जात आहे. महिला, युवक, युवती, ज्येष्ठांसाठी कल्याणकारी योजना राबवून त्यांना ताकद दिली आहे. कॉमन मॅन सुपर मॅन झाला पाहिजे या उद्देशाने महायुतीने कारभार केला आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. लाडकी बहिण योजनेमुळे विरोधक गोंधळलेले आणि गडबडले आहेत असा आरोपही महायुतीकडून यावेळी करण्यात आला. (Eknath Shinde )

महायुतीच्यावतीने सव्वा दोन वर्षातील विकास कामाच्या रिपोर्ट कार्ड प्रसिध्द् केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात सर्व प्रकल्पांना स्थगिती दिली होती पण, आमचे सरकार आल्यावर स्थगिती उठवून सर्व प्रकल्प वेगाने कार्यान्वित केले. राज्यातील उद्योग गुजरातला पळवले अशी टीका करुन विरोधक गुजरातची बाजू घेत आहेत. पण गेल्या अडीच वर्षात राज्यात मोठी गुंतवणूक झाली असून महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावरुन पहिल्या क्रमांकावर आला आहे. कल्याणकारी योजनांची घोषणा करुन त्या कार्यान्वित केल्या. गेल्या सव्व्वा दोन वर्षात प्रचंड काम केल्याने आम्ही रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध केले. रिपोर्ट कार्ड काढायला हिंमत लागते असा टोलाही त्यांनी विरोधकांवर लगावला. (Eknath Shinde)

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्थगिती आणणारे सरकार गेल्यानंतर गेल्या सव्वा दोन वर्षात गतीने काम करणारे आणि प्रगतीपथावर राज्याला आणणारे सरकार आले आहे. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी करणारे सरकार असून शेतकऱ्यांना ३६५ दिवस दिवसा वीज देण्यासाठी महायुती सरकारने १५ ते १८ महिन्यात १४ हजार मेगॅवॅट सौर उर्जेवर वीज तयार करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. १४५ सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली असून त्यामुळे राज्यातील २२ लाख ७३ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. वेगवेगळ्या समाजासाठी महामंडळ स्थापित करुन प्रगतीची व्दारे खुली केली आहेत.

लाडकी बहिण योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांचा फडवणवीस यांनी समाचार घेतला. आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे अनुदान दोन हजार रुपये करणार असे विरोधक सांगत आहेत आणि दुसरीकडे ही योजना बंद पडणार, सरकारकडे पैसे नाहीत अशी टीका करत आहेत. मग त्यांचे सरकार आल्यावर कुठुन पैसे आणणार याकडे त्यांनी लक्ष वेधत विरोधक गोंधळलेले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. राज्यात स्थगिती आणणारे सरकार आणून सर्व योजना कुलुप बंद करण्याचा प्रयत्न विरोधकांना त्यांची जागा मतदार निवडणूकीत दाखवून देतील असेही ते म्हणाले, महिलांना मदत करणारे, त्यांना सरंक्षण देणारे आणि त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांना कडक शिक्षा देणारे महायुतीचे सरकार असल्याचा दावाही त्यांनी केला. (Eknath Shinde )

विरोधक खोटे नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. लाडकी बहिण योजना, कृषीपंप वीज बिल माफी या योजना कधीच बंद केल्या जाणार नाहीत. तर, यापुढेही त्या कायम राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार सदाभाऊ खोत, प्रविण दरेकर, प्रसाद लाड उपस्थित होते.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00