महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉर्डग-गावस्कर ट्रॉफीतील चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखले. भारताने दुसऱ्या दिवशी पाच फलंदाज गमावून १६४ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना कोहली- जैस्वाल जोडीने तिसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली. परंतु, यशस्वी धावबाद झाल्यानंतर विराटने विकेट गमावली. बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये जाताना विराटने संयम गमावला आणि प्रेक्षकांशी बाचाबाची करू लागला. यावेळी ग्राऊंड स्टाफने मध्यस्थी करत विराटला पॅव्हेलियनमध्ये नेले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Virat Kohli)
तिसऱ्या विकेटसाठी विराट आणि जैस्वालने चांगली भागिदारी करून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, सामन्याच्या ४१ व्या षटकात जैस्वाल स्वताच्या चुकीमुळे धावबाद झाला. काही अंतराने विराटनेही आपली विकेट गमावली. विराटला स्कॉट बोलँडने कोहलीला यष्टिरक्षक कॅरीकरवी झेलबाद केले. त्याने आपल्या खेळीत ८६ चेंडूंत ३६ धावा केल्या.
बाद झाल्यानंतर विराट कोहली पॅव्हेलियनमध्ये जात असताना क्रिकेटप्रेमींनी विराटला डिवचले. यानंतर विराटचा पारा चांगलाच चढला. यामुळे पॅव्हेलियनेमध्ये जाणारा विराट पुन्हा बाहेर आला आणि प्रेक्षकांशी वाद घालू लागला. दरम्यान तेथे उपस्थित असणाऱ्यामुळे ग्राउंड्समनने वेळीच हस्तक्षेप करत विराटला चाहत्यांपासून दूर केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराटवर आयसीसीची कारवाई
बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस चांगलाच गाजला. सामन्याचा पहिला दिवस गाजला तो विराट आणि ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू सॅम कॉन्स्टस यांच्यामुळे. सॅम कॉन्स्टसने कारर्किदितील पहिल्याच सामन्यात आक्रमक खेळी करत आजचा दिवस गाजवला. दरम्यान, त्याचा विराटसोबत वाद झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. सामन्यादरम्यान विराट आणि सॅम कॉन्स्टस यांच्यात झालेल्या वादामुळे आयसीसीने विराटवर कारवाई केली आहे. (Virat Kohli)
सामन्याच्या १० व्या षटकात मोहम्मद सिराज आणि सॅम कॉन्स्टस यांच्यात वादावादी झाली. यानंतर विराट चालत जाताना सॅम कॉन्स्टसला त्याचा धक्का बसला. यावेळी कॉन्स्टस आणि विराट यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावेळी विराटने त्याच्या दिशेने जात त्याला काहीतरी बोलला. यामुळे दोघांमधील वाद वाढला. यावेळी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा आणि पंच मायकेल गॉफ यांनी मध्यस्थी करत दोघांना दूर केले. परंतु, या वादामुळे आयसीसीचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉप्ट यांनी विराटवर कारवाई केली आहे. विराटच्या सामना शुल्कात २० टक्के कपात करण्यात येणार आहे. तसेच त्याला एक डिमेरिट पाँइंटही देण्यात आला आहे.
Virat Kohli almost recreated that incident with a CSK fan at Wankhede 😭😭 pic.twitter.com/35qDBKxuv3
— Pari (@BluntIndianGal) December 27, 2024
हेही वाचा :