रायपूर : दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात ऋतुराज गायकवाड (१०५), विराट कोहली (१०२) यांनी शतके झळकावत तिसऱ्या गडासाठी १८५ धावांची भागिदारी केली. महाराष्ट्राच्या ऋतुराजने धुवाँदार फलंदाजी करत ७७ चेंडूत एक दिवशीय सामन्यातील पहिलेच शतक झळकावले. तर या मालिकेत विराट कोहलीने सलग दुसरे शतक झळकावत टीकाकारांची तोंडे बंद केली. कर्णधार के.एल. राहूलने ६६ धावा केल्या. भारताने आफ्रिकेला ३५९ धावांचे आव्हान दिले आहे. दक्षिण आफ्रिकेने २२ षटकात २ बाद १३३ धावा केल्या आहेत. (Rituraj, Virat’s centuries)
दमदार सलामीनंतर रोहित, बर्गर बाद
प्रथम फलंदाजी करताना भारताने पाच षटकात ४० धावा करत दमदार सुरुवात केली. पण सलामीर रोहित शर्मा आठ चेंडूत १४ धावा करत बाद झाला. बर्गरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक डी कॉकने झेल टिपला. त्यानंतर दहाव्या षटकात यशस्वी जयस्वाल बाद झाला. त्याने २२ धावा करताना दोन चौकार आणि एक षटकार खेचला. डावखुरा गोलंदाज मार्को जेसनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.
डाव सावरत विराट, ऋतुराजची शतके
विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांची जोडी मैदानावर जमली. दोघांनी आफ्रिकन गोलंदाजाचा समाचार घेतला. ऋतुराज गायकवाड तर फुल फार्मात होता. त्याने ७७ चेंडूत शतक झळकावले. त्याने १२ चौकार आणि दोन षटकार खेचले. संघाची धावसंख्या २५७ असताना तो बाद झाला. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १८५ धावांची भागिदारी केली. जेसनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीने शतक झळकावले. ९३ चेंडूत १०२ धावा करताना सात चौकार आणि दोन षटकार मारले. लुंगी एन्गिडीने त्याला बाद केले. वॉशिंग्टन सुंदर एक धावांवर धावबाद झाला.
कर्णधार राहूलची फटकेबाजी
कर्णधार के.एल. राहूल आणि रवींद्र जडेजा यांनी संघाचे त्रिशतक धावफलकांवर लावले. राहूलने हाणामारीच्या षटकात सहा चौकार आणि दोन षटकार मारले. त्याने ४३ चेंडूत ६६ धावा चोपल्या. रवींद्र जडेजाने २४ धावा केल्या. भारताने ५० षटकात ५ बाद ३८५ धावा केल्या. (Rituraj, Virat’s centuries)
मार्करमची आक्रमक खेळी
दक्षिण आफ्रिकेने सावध सुरुवात केली. पाचव्या षटकात अर्शदीपने डी कॉकला वॉशिंग्टन सुंदरकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने ८ धावा केल्या. त्यानंतर मार्कम आणि कर्णधार टेमबा बवुमाने डाव सावरला. मार्करम आक्रमक फलंदाजी करत आहे. तो ६७ धावांवर खेळत आहे. प्रसिद्ध कृष्णाने जोडी फोडताना कर्णधार बवुमाला बाद केले. त्याने ४६ धावा केल्या. दक्षिण आफिक्रेने २२ षटकात १३३ धावा केल्या आहेत. (Rituraj, Virat’s centuries)





