Home » Blog » Violent clashes in Bihar: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी

Violent clashes in Bihar: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी

by प्रतिनिधी
0 comments
Violent clashes in Bihar

पाटणा : दरभंगा येथे एका रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कथित शिवीगाळ केल्याचा आरोप करत भाजपने शुक्रवारी (२९ ऑगस्ट)  पाटणा येथे तीव्र निदर्शने केली. यावेळी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. (Violent clashes in Bihar)

वृत्तसंस्था एएनआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते पक्षाच्या झेंड्याच्या काठ्यांनी एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत.

‘‘आईचा अपमान केल्याबद्दल बिहारचा प्रत्येक मुलगा काँग्रेसला योग्य उत्तर देईल. आम्ही याचा बदला घेऊ,’’ असा इशारा भाजप आमदार नितीन नबीन यांनी दिला आहे. (Violent clashes in Bihar)

दरम्यान, काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले की, दरभंगा रॅलीदरम्यान भाजपच्याच ‘एजंट’ ने पंतप्रधानांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली.

ते म्हणाले, ‘‘ही टिप्पणी त्यांच्या (भाजपच्या) स्वतःच्या एजंटने केली आहे. ते फक्त एक मुद्दा निर्माण करू इच्छितात जेणेकरून ते आमच्या यात्रेवरून लक्ष हटवू शकतील. त्यांची चोरी पकडली गेली आहे, म्हणून हे लोक निराश आहेत.’’ (Violent clashes in Bihar)

‘‘ज्याला अटक करण्यात आली ती व्यक्ती कोण आहे, तो कोणाचा माणूस आहे ते शोधा… जनता सर्वकाही पाहत आहे आणि संपूर्ण देश भाजपच्या गुंडगिरीकडे पाहत आहे,’’ असे ते पुढे म्हणाले.

डीएसपी (कायदा आणि सुव्यवस्था) कृष्णा मुरारी प्रसाद म्हणाले की, या हाणामारीदरम्यान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेकही केली.

‘‘दगडफेकीची घटना घडली आहे. आम्ही सविस्तर चौकशी करू. मालमत्तेचे नुकसान झाले असेल तर त्या संदर्भात पोलिस ठाण्यात निश्चितच अर्ज केला जाईल आणि चौकशी केली जाईल,’’ असे ते म्हणाले.

‘‘या घटनेची माहिती मिळताच, आम्ही तातडीने कारवाई केली. जवळच्या पोलिस ठाण्यांनाही कळवण्यात आले आणि घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले,’’ असे ते म्हणाले.

बिहारमधील राहुल गांधी यांच्या रॅलीच्या ठिकाणी काही जणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हाणामारीची घटना घडली.

सोशल मीडियावर अनेक अकाउंट्सनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांच्या रॅलीच्या व्यासपीठावरून अज्ञात व्यक्ती पंतप्रधान मोदींविरुद्ध हिंदी भाषेत अपशब्द वापरताना दिसत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी राजद नेते तेजस्वी यादव यांच्यासोबत बिहारमध्ये ‘मतदार अधिकार यात्रा’ सुरू आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही या घटनेचा निषेध केला. शिविगाळीचे कृत्य निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00