Home » Blog » Venue change : मुंबई विरुद्ध पंजाब सामन्याचे ठिकाण बदलले

Venue change : मुंबई विरुद्ध पंजाब सामन्याचे ठिकाण बदलले

ऑपरेशन सिंदूरचा परिणाम

0 comments
Venue change

नवी दिल्ली : भारत पाकिस्तानमधील तणाव, ऑपरेशन सिंदूर यामुळे धर्मशाळा या शहरातील विमानतळ बंद ठेवल्याचा त्याचा परिणाम टाटा आयपीएल सामन्यांवर झाला. धर्मशाळा येथे होणारा पंजाब किंग्ज आणि मुंबईतील सामना धर्मशाळेतून हलवला असून हा सामना गुजरातमधील अहमदाबाद येथे होणार आहे. (Venue change)

पंजाब आणि मुंबई यांच्यातील आयपीएलमधील सामना धर्मशाळेहून अलहाबाद मध्ये हलवण्यात आला आहे, अशी माहिती गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांनी दिली. धर्मशाळा येथील विमानतळ बंद असल्याने मुंबई इंडियन्सचा संघ मुंबईहून धर्मशाळा येथे पोहोचणे शक्य होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी मुंबईचा संघ धर्मशाळेकडे विमानाने रवाना होणार होता. पण विमानतळ बंद असल्याने त्यांना मुंबईतच थांबावे लागले. (Venue change)

पंजाब आणि मुंबई यांच्यातील सामन्याची तारीख निश्चित झाल्यानंतर दिल्ली आणि पंजाब हे दोन्ही संघ धर्मशाळेतून बाहेर पडणार आहेत. सध्या दोन्ही संघ धर्मशाळेत आहेत. विमानसेवा बंद असल्याने दोन्ही संघांना धर्मशाळेतून हलवताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी लागणार आहे. आज दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होत आहे. (Venue change)

पंजाब आणि मुंबईतील सामना ११ मे रोजी होणार होता. पण आता विमानतळ बंद असल्याने पंजाब आणि दिल्ली संघाला लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागणार आहे. रेल्वे प्रवासासह सर्व संभाव्य पर्यायांचा विचार केला जात आहे. सामन्यांमध्ये पुरेसा वेळ नसल्याने आणि लांब प्रवास असल्याने खेळाडूंचा आरामाचा विचार करणे आवश्यक आहे, संघाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. (Venue change)

“आपल्याला खेळाडूंच्या आरामाची काळजी घ्यावी लागेल. आपल्याला लहान बसेस वापरून डोंगराळ भागात प्रवास करावा लागेल. त्यामुळे प्रवासाचे दोन भाग करण्याची योजना आहे परंतु अद्याप काहीही अंतिम नाही. संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल कारण पीबीकेएस आणि डीसी दोघेही सामन्यानंतर लगेचच त्यांचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. मैदानापासून सुमारे दोन तासांच्या अंतरावर एक रेल्वे स्टेशन आहे, ते देखील शोधले जात आहे.” असे अधिकारी स्पष्ट केले. (Venue change)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00