Home » Blog » झिरवाळांच्या व्हायरल व्हिडीओची सत्यता तपासणार :  फडणवीस

झिरवाळांच्या व्हायरल व्हिडीओची सत्यता तपासणार :  फडणवीस

by प्रतिनिधी
0 comments
The authenticity of Zirwal's video will be verified

जमीर काझी : मुंबई :  महायुती सरकारमधील मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एका तृतीयपंथीसोबत व्हायरल अश्लील कथित व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र व्हायरल व्हिडीओ हा दोन,तीन व्हिडीओ एकत्रित जोडून तयार केल्याचा दावा झिरवळांनी केल्याने त्याची सत्यता तपासून निर्णय घेऊ, असे शुक्रवारी जाहीर केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही चौकशीपूर्ण होईपर्यंत त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री झिरवाळ यांचा एक कथित व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावरून झिरवाळांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी महाविकास आघाडीने केली आहे. त्यामुळे लिंग पिसाट भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणानंतर राज्य सरकारवर पुन्हा दबाव वाढला आहे.त्यामुळे राजकीय आरोप- प्रत्यारोप होत आहेत. (The authenticity of Zirwal’s video will be verified)

 याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “नरहरी झिरवाळ यांनी मला फोन करून सांगितलं की, तो व्हिडीओ दोन-चार व्हिडीओ एकत्रित जोडून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यावर याविषयी तात्काळ तक्रार दाखल करा, या व्हिडीओची शाहनिशा करण्यात येईल असा आपण सल्ला दिला.”असे त्यांनी स्पष्ट केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसने ही झिरवळांची पाठराखण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जोपर्यंत चौकशी होऊन सत्यबाब स्पष्ट होत नाही, तोपर्यंत त्यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान,यापूर्वी जानेवारी महिन्यात मंत्रालयातील झिरवाळ यांच्या दालनातील एका क्लार्कला लाचखोरी प्रकरणात अटक झाली. त्याबाबत झिरवाळांचा कोणताही हात नसल्याचे अहवाल प्राप्त झाल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट दिली होती. त्यानंतर नरहरी झिरवाळ आता पुन्हा या व्हायरल व्हिडीओमुळे अडचणीत आले आहेत. (The authenticity of Zirwal’s video will be verified)

आता जी घटना समोर आली आहे ती गंभीर आहे. त्याची सत्यता तपासली जाईल. त्यानंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार आणि आम्ही मिळून योग्य तो निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. (The authenticity of Zirwal’s video will be verified)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00