Home » Blog » राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी उमेश पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी उमेश पाटील

by प्रतिनिधी
0 comments
Umesh Patil appointed as the national chief spokesperson for the NCP

मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची तर मुंबई अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी यांची बुधवारी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.  राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा  पवार यांनी ही नियुक्ती जाहीर केली. (Umesh Patil appointed as the national chief spokesperson for the NCP)

  देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ  पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पक्षाचे अन्य नेते व पदाधिकारी उपस्थित होते. लोकनेते अजितदादा पवार यांचे विचार, आदर्श आणि जनसेवेचा वारसा पुढे नेत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी उमेश पाटील आणि झिशान सिद्दीकी यांनी निष्ठेने व समर्पणाने कार्य करावे, अशी अपेक्षा सुनेत्रा पवार यांनी  यावेळी व्यक्त केली आहे. (Umesh Patil appointed as the national chief spokesperson for the NCP)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!