वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे कारण देत १२ देशांमधील नागरिकांवर प्रवास बंदी घालण्याची घोषणा केली आहे. इराण, अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, कॉग्रो प्रजासत्ताक, इरिट्रिया, हैती, लिबिया, सोमालिया, सुदान, येमेन या देशांचा समावेश आहे. (Trump travel ban )
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या अबीगेल जॅक्सन यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की “आपल्या देशात येऊन आपल्याला हानी पोहोचवू इच्छिणाऱ्या धोकादायक परदेशी घटकांपासून अमेरिकन लोकांचे संरक्षण करण्याचे वचन अध्यक्ष ट्रम्प पूर्ण करत आहेत.” (Trump travel ban )
ट्रम्प यांनी सुरुवातीच्या अध्यक्षपदाच्या काळात सात मुस्लिम बहुल देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लादले. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाची मान्यता मिळण्यापूर्वी या धोरणात अनेक सुधारणा करण्यात आल्या, असे रॉयटर्सने वृत्त दिले आहे. पण ट्रम्प यांच्यानंतर सत्तेवर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी २०२१ मध्ये हे निर्बंध रद्द केले होते. हा निर्णय घेताना त्यांनी “आपल्या राष्ट्रीय विवेकावर एक डाग आहे.” असे म्हटले होते. (Trump travel ban )
अमेरिकेसाठी उच्च पातळीचा धोका निर्माण करणाऱ्या सात देशांमधील नागरिकांच्या प्रवेशावर अंशतः निर्बंध आणि मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान, व्हेनेझुएला या देशांचा समावेश आहे.
अफगाणिस्तानवरील नागरिकांवर बंदी घालताना अमेरिकेने असे म्हटले आहे की तालिबानच्या नियंत्रणाखाली असलेल्या अफगाणिस्तानला एसडीजीटी गट म्हणून घोष्घ्त केले आहे. तिथे पासपोर्ट जारी करणे किंवा नागरी कागदपत्रे हाताळण्यासाठी प्रभावी केंद्रीय अधिकार नाहीत. तिथे योग्य तपासणी आणि प्रोटोकॉलचा अभाव आहे. अमेरिकेने इराणला दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणार देश म्हणून घोषीत केले आहे. व्हाईट हाऊसच्या निवेदनानुसार इराण सातत्याने अमेरिकन अधिकाऱ्यांशी असहकार दाखवत आहे. तसेच हा देश जागतिक दहशतवादाचा एक महत्वाचा स्त्रोत म्हणून काम करतो. सोमालिया, लिबिया, हैती, इरिट्रिया, इक्वेटोरियल गिनी, काँगो प्रजासत्ताक, चाड या देशांमध्ये पासपोर्ट किंवा नागरी कागदपत्रे जारी करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाचा अभाव असल्याचे म्हटले आहे. (Trump travel ban )