Home » Blog » राष्ट्रवादी, शिवसेनेचे २५ ते ३० आमदार भाजपमध्ये जाणार : संजय राऊत

राष्ट्रवादी, शिवसेनेचे २५ ते ३० आमदार भाजपमध्ये जाणार : संजय राऊत

by प्रतिनिधी
0 comments
25 to 30 MLAs from the NCP and Shiv Sena are set to join the BJP

मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्षातील २५ ते ३० आमदार भाजपमध्ये जातील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दोन्ही पक्षातील फाटाफुटीचे नेतृत्व कोणाकडे असेल हे मी आत्ता सांगत नसल्याचे ते म्हणाले. पक्षांतर बंदी कायदानुसार सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत असलेल्या सुनावणीवर त्यांनी टीका केली. (25 to 30 MLAs from the NCP and Shiv Sena are set to join the BJP)

राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणाबाबत पत्रकारांनी प्रश्न केला असता संजय राऊत म्हणाले, राष्ट्रवादी अजित पवारांचा स्वतंत्र पक्ष आहे. सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे अजित पवारांचे सहकारी होते. पण अजितदादांच्या निधनानंतर नव्या रचनेत सुनेत्रा पवारांचे सहकारी असतील असे नाही. त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे असे म्हणत त्यांनी भविष्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटातील २५ ते ३० आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होणार असल्याचा दावा केला. दोन्ही पक्ष भाजपमध्ये विलीन होण्याच्या मानसिकतेत असून भाजपनेच त्यांना काहीकाळ थांबण्यास सांगितले आहे असा दावाही राऊत यांनी केला. (25 to 30 MLAs from the NCP and Shiv Sena are set to join the BJP)

सर्वोच्च न्यायालयावर भाष्य करताना राऊत म्हणाले. पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचा महत्वाचा खटला आहे. पण या खटल्याच्या सुनावणीला सातत्याने पुढील तारखा मिळत आहेत. अनेक न्यायाधीश पदावरुन गेले आहेत. पण अंतिम सुनावणी झालेली नाही. न्याय व्यवस्था ही राजकारण्याच्या दबावाखाली आहे. न्यायाधीशांवर दबाव असेल तर त्यांनी सांगितले पाहिजे. निवडणूक आयोगावर संशय घेता येत नाही असे म्हणणाऱ्या न्यायालयावरच संशय यायला लागला आहे. (25 to 30 MLAs from the NCP and Shiv Sena are set to join the BJP)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00