-
संजीव चांदोरकर
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयात अमेरिकेतील मक्तेदार कंपन्यांचा निर्णायक वाटा आहे. ज्या चमूचे नेतृत्व एलॉन मस्क करत आहेत; त्या निमित्ताने हा फिनोंमिनॉन समजून घेण्याची निकड आहे. कारण हे भारतासकट अनेक राष्ट्रात घडत आहे. (Donald Trump)
या छोटया पोस्टचा जीव लक्षात घेणे. खाली एक फ्रेम दीली आहे. प्रत्येक देशात यातील प्रत्येक गोष्ट, तशीच, त्याच अनुक्रमे घडेल असे नाही.
१. महाकाय उत्पादन क्षमता मुळे, “इकॉनॉमिज ऑफ स्केल” मुळे त्यांचा प्रति युनिट उत्पादन खर्च कमी असतो. त्यात मार्केटमधील आपला हिस्सा वाढवण्यासाठी, या महाकाय कंपन्या आपल्या वस्तुमाल / सेवेची किंमत कमी करतात, वेळ पडलीच तर तोटा सहन करून.
२. मोठ्या कंपन्यांच्या किमतीत माल विकून तोटा सहन करण्याची ताकद नसलेले मध्यम / लहान स्पर्धक दुकान बंद हळूहळू करतात. भारतातील मोबाईल सेवा, रिलायन्स जीओचा प्रवेश एक केस स्टडी आहे
३. या किमती अंडरकट करण्याच्या रक्तरंजित स्पर्धेत जे स्पर्धक टिकतात त्यांना महाकाय कंपन्या विकत घेतात. भारतात तर शासकीय संस्थांचा दडपण आणण्याची प्रक्रिया सुरु आहे. उदा सिमेंट क्षेत्रात अगदी अलीकडे प्रवेश करून फक्त काही वर्षात अदानी समूह देशातील अग्रगण्य सिमेंट उत्पादक बनला आहे.(Donald Trump)
ब्रँडचा बाजार
४. कंपनीच्या उत्पादक मत्ता / म्हणजे कारखाना वगैरे विकत न घेता फक्त ब्रँड विकत घेतला जातो. आपण सगळेच विविध वस्तू विकत घेताना दुकानांदाराला ब्रँडचे नाव सांगतो. त्याची उत्पादक कंपनी कोण याची आपल्याला काहीही पडलेली नसते. अनेक ब्रँड ज्या कंपनीने स्थापित केले. त्यांची मालकी काही वर्षांनी दुसऱ्या कंपनीकडे गेलेली असते.
५. फॉरवर्ड आणि / किंवा बॅकवर्ड इंटिग्रेशन.
आपण विकत घेत असलेला उपभोग्य वस्तुमाल अनेक मूल्यवृद्धीच्या पायऱ्यांवरून चढत उपभोग्य बनतो. उदा औषध निर्माण कंपन्यांना बरीच रसायने लागतात. जी ती सर्व स्वतः बनवत नाहीत. इतर कंपन्यांकडून विकत घेतात. त्यातून त्यांच्या नफ्याच्या मार्जिन्स कमी होतात. मग औषध निर्माण करणारी कंपनी तिला कच्चा / अर्धपक्का माल पुरवणाऱ्या कंपनीला विकत घेते. किंवा मध्यंतरी देशातील अनेक मोठे विमानतळ चालवणाऱ्या अदानी समूहाने, एक ट्रॅव्हल कंपनी विकत घेतली(Donald Trump)
हे सगळे करण्यासाठी प्रचंड भांडवल लागते. आपल्याला वाटते कि ते भांडवल विकत घेणाऱ्या कंपनीकडे अनेक वर्षांच्या नफ्यातून संचित झालेले असेल. किंबहुना नसतेच.(Donald Trump)
त्यासाठी वित्त भांडवल पुढे येते. प्रायव्हेट इक्विटी , विविध प्रकारचे फंड, आयपीओ मधून उभारलेले भांडवल , बँका / एनबीएफसी कडून उभारलेली कर्जे शेकडो कोटी रुपये पुरवतात
दुसऱ्या शब्दात औद्योगिक क्षेत्रातील मोनोपॉली / ऑलिगोपोली तयार करण्यात वित्त भांडवलाचा खूप मोठा सहभाग आहे. वित्त भांडवल आहे. पण वित्त भांडवलदार नसतात. वित्त भांडवल नागरीकांच्या बचती वापरते. वित्त भांडवल पडद्यामागून निभावत असणाऱ्या या भूमिकेबद्दल आपण अनभिज्ञ असतो.
मोनोपॉली / ऑलिगोपोली मुळे स्पर्धेचा लोप होतो. स्पर्धा भांडवलशाहीचा आत्मा आहे , ती अर्थव्यस्वस्थेसाठी / समाजासाठी / ग्राहकांसाठी हिताचीच आहे हे आपल्याला शाळेपासून पढवले जाते. कोठे गेले ते ज्ञान ? फक्त पुस्तकात?
मोनोपॉली / ऑलिगोपोली निखळ आर्थिक फिनॉमिनॉन नाही; मक्तेदार कंपन्यांची राजकीय ताकद वाढते. कोण राज्य करणार यावर ते निर्णायक प्रभाव टाकतात. निवडणुका जिंकून देतात. आपल्याला हवे ते राज्यकर्ते सत्तेवर आणल्यावर आपल्याला हवी तशी आर्थिक धोरणे राबवतात.(Donald Trump)
मक्तेदारीकरण आणि आर्थिक विषमता हातात हात घालून
आर्थिक विषमता वाढते. गेल्या ४० वर्षात मक्तेदारीकरण आणि आर्थिक विषमता हातात हात घालून वाढत आहेत. त्यातून सामाजिक असंतोष , त्या असांतोषाची वाट बिगर वर्गीय इश्यूवर उदा अस्मिता / स्थलांतरित / अल्पसंख्य यांच्या विरुद्ध काढली जाते. अण्णा आंदोलनाला पैसै पुरवले जातात. अर्थसंकल्पातून लाडकी बहीण योजनेला विरोध केला जात नाही. आज जगभर उजव्या राजकीय शक्तींनी जोर धरण्याची मुळे इथपर्यंत जाऊन भिडतात
आयुष्यभर खाजगी कॉर्पोरेट भांडवलशाहीचे सुटेड बुटेड , पीएचडी समर्थक याबद्दल गप्प आहेत. पुढच्या पिढ्यांसाठी काय हिताचे हे मांडायला यांच्याकडे ना संवेदनशीलता आहे ना बौद्धिक प्रामाणिकपणा !
तुम्ही डाव्या विचारांचे व्हा असे कोणी म्हणत नाही. पण कॉर्पोरेट / वित्त भांडवलशाहीत काय सुरु आहे याबद्दल बोलाल कि नाही ?
यांना आपल्यापेक्षा जास्त माहित आहे. कारण ते त्याचे एक अविभाज्य भाग आहेत. या बुद्धिवादी , प्रोफेशनल लोंकानी स्पष्ट भूमिका न घेतल्यामुळे जगाचे, पुढच्या पिढ्यांचे खूप नुकसान केले आहे
(२४ जानेवारी २०२५)
हेही वाचा :
२० फेब्रुवारीआधी आमचे सिझेरियन करा