Home » Blog » Tribute to Mahatma Phule: महात्मा फुले यांना देशभर आदरांजली

Tribute to Mahatma Phule: महात्मा फुले यांना देशभर आदरांजली

महात्मा फुले समग्र वाङ्मय पुनर्मुद्रित ग्रंथांचा वितरण समारंभ

by प्रतिनिधी
0 comments
Tribute to Mahatma Phule

पुणे : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त देशभर त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पुण्यातील फुले वाडा येथे मोठ्या संख्येने एकत्र येत त्यांच्या तसेच सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार छगन भुजबळ यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.(Tribute to Mahatma Phule)

महाराष्ट्र महात्मा फुले समग्र वाङ्मय व सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय या पुनर्मुद्रित ग्रंथांचा वितरण सभारंभ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला आमदार छगन भुजबळ हेही उपस्थित राहिलो. याप्रसंगी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. (Tribute to Mahatma Phule)

गेल्या काही काळापासून शासनाकडून बंद करण्यात आलेले हे वाङमय प्रकाशन पुन्हा सुरू करण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने पुन्हा फुले दाम्पत्याच्या पुनर्मुद्रित ग्रंथांचे वितरण सुरू केले, याचा मनापासून आनंद वाटतो. याबद्दल सरकारचे मनापासून आभार, अशा भावना आ. भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केल्या. तसेच महात्मा फुले समग्र वाङ्मय व सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय हे ग्रंथ प्रत्येकी ५० रुपये या सवलतीच्या दरात वाचकांसाठी उपलब्ध झाले आहेत. तरी इच्छुकांनी अवश्य हे ग्रंथ खरेदी करून त्यांचा अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले. (Tribute to Mahatma Phule)

यावेळी आमदार हेमंत रासने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव, प्रा. दिवाकर गमे, ‘फुले’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन, निर्मात्या अनुया चौहान कुडेचा, सहनिर्माते रोहन गोडांबे, महात्मा जोतीराव फुले चरित्र साधन प्रकाशन समितीचे सर्व सदस्य तसेच प्रितेश गवळी, मंजिरी धाडगे, डॉ. स्नेहा सोनकाटे, यश बोरावके, योगेश पिंगळे, पंढरीनाथ बनकर, सपना माळी, अविनाश चौरे, वैष्णवी सातव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी निवासस्थानी केले अभिवादन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील शासकीय निवासस्थानी महात्मा फुले यांना अभिवादन केले. आपल्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

अजित पवार यांनी केले अभिवादन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फुले वाडा येथे भेट देऊन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी फुलेंशी संबधित छायाचित्रे आणि वस्तूंचा संग्रह असलेल्या संग्रहालयाची पाहणीही त्यांनी केली.

महात्मा फुले भारताच्या सामाजिक क्रांतीचे शिल्पकार : सपकाळ

महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर भारताच्या सामाजिक क्रांतीचे शिल्पकार होते, अशा भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या.

पुणे येथे फुलेवाड्यात महात्मा फुले यांना अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. (Tribute to Mahatma Phule) शिक्षण, स्त्री-समानता, जातीव्यवस्थेविरोधातील संघर्ष, शेतकरी आणि कामगारांचे हक्क अशा अनेक लढ्यांचे मूळ महात्मा ज्योतिबांच्या विचारात आहे. त्यांचा प्रत्येक विचार आजही तितकाच प्रासंगिक आणि प्रेरणादायी आहे. फुलेवाडा येथे जाऊन अभिवादन करणं, ही फक्त एक परंपरा नव्हे – तर विचारांशी निष्ठेची जाणीव आहे. फुलेवाडा ही केवळ एक वास्तू नसून, ती क्रांती, समता आणि जागृतीचे प्रतीक आहे. आजच्या भेटीदरम्यान त्या पवित्र मातीला स्पर्श करताना जाणवले की हा लढा अजून पूर्ण झालेला नाही, आणि आपल्याला तो पुढे नेण्याचीच खरी जबाबदारी आहे, अशा भावना सपकाळ यांनी व्यक्त केल्या.


हेही वाचा :
‘काश्मीर फाईल्स’ चालतो, मग ‘फुले’वर आक्षेप का?

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00